आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Film Industry In Crisis Due To Closure Of Theaters In Mumbai MP, Loss Of 50 Crores Every Week

मुंबई-एमपीमधील थिएटर बंद पडल्यामुळे चित्रपट उद्योग संकटात, दर आठवड्याला 50 कोटींचे नुकसान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमिताभ, जान्हवी, अक्षय, रणवीर प्रत्येकाच्या लाइन अपवर परिणाम
  • नेटफ्लिक्सने ऑफिस बंद केले, सलमान-हृतिकने टूर लांबणीवर टाकले
  • 'फास्ट अँड फ्युरियस 9'चे प्रदर्शन 11 महिन्यांसाठी पुढे ढकलले

बॉलिवूड डेस्कः कोरोनामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि मध्य प्रदेशसह महाराष्ट्रातील पाच प्रमुख शहरांमधील चित्रपटगृह बंद करण्यात आले आहेत. बिहार, दिल्ली, जम्मू, केरळमध्ये यापूर्वीच थिएटर बंद झाले आहेत. अतुल मोहन (बॉलिवूडच्या आर्थिक घडामोडींतील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार) यांच्या माहितीनुसार, सद्य परिस्थितीतून हे स्पष्ट झाले आहे की उर्वरित राज्येही आपले चित्रपटगृहे बंद करतील आणि फिल्म इंडस्ट्रीवर खोल संकट निर्माण होईल. जर संपूर्ण मार्च महिन्यात थिएटर बंद राहिले तर लोक 2 एप्रिलपासून चित्रपटगृहांमध्ये येतील, असे होणार नाही. त्यांच्या मनातून कोरोनाची भीती दूर व्हायला महिनाभर लागेल. अशा परिस्थितीत या उद्योगावर दूरगामी परिणाम होईल.


'सूर्यवंशी' आणि '83' या दोघांच्या रिलीजची तारीख एप्रिलपर्यंत नव्हे तर मे ते जूनपर्यंत पुढे जाणार असल्याचे चित्र दिसत आहे. ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणा-या चित्रपटांसोबत  या चित्रपटांचा संघर्ष निश्चित आहे. तर, अशी परिस्थिती उद्भवली आहे की, सर्व मोठे स्टार्स आणि बॅनर एकत्र बसून रिलीजच्या तारखांचे काय करायचे हे त्यांना ठरवावे लागेल. जेम्स बाँड सीरिजचा चित्रपट थेट नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार आहे, तशीच परिस्थिती भारतीय चित्रपटांचीही होताना दिसतेय.

सर्व तोट्याच्या वर्तुळात

या परिस्थितीमुळे प्रत्येकाचे नुकसान होत आहे. स्टार्स, सुपरस्टार्स सर्वजण या चक्रात अडकले आहेत. 10 एप्रिलनंतर अमिताभ, जान्हवी यांच्या मोठ्या चित्रपटांचे लाइन अप रिलीजसाठी तयार आहेत. मेच्या पहिल्या आठवड्यात 'कुली नंबर वन' आणि त्यानंतर पुढे 'अमिताभ बच्चन' यांचा 'झुंड' आहे. त्यानंतर 22 मे ही तारीख सलमान खानच्या 'राधे' आणि अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी बॉम्ब'च्या रिलीजसाठी निश्चित झाली आहे. त्यानंतर 5 जूनच्या स्लॉटमध्ये जान्हवी कपूरचा 'रुही अफजाना' आहे. परिणामी, उद्भवणार असलेल्या मोठ्या संकटाचे उत्तर कोणाकडेही नाही. या नुकसानीबद्दल बोलल्यास, दर आठवड्याला सुमारे 50 कोटींचे नुकसान भारतीय चित्रपटगृहांचे होणार आहे.

‘अंग्रेजी मीडियम’चे नुकसान 

‘अंग्रेजी मीडियम’चे तीन ते सहा कोटींचे नुकसान एकट्या दिल्ली शहरातूनच झाले आहे. तेथील प्रसिद्ध सिनेचेन डिलाईटचे जीएम आरके मेहरोत्रा ​​म्हणाले, "आमच्या सर्व जाहिराती आणि  कंटेंट प्रोव्हाइडरचे मोठे नुकसान होत आहे. गुरुवारीपुर्वीपर्यंत  एकट्या डिलाइटमध्ये 80 टक्के व्यवसाय झाला होता. अंग्रेजी मीडियम पाच शोमध्ये प्रदर्शित होणार होता. आमच्या दोन थिएटरच्या स्क्रीनसाठी आधीच 600 तिकिटे अॅडव्हान्स बुक झाली होती.  दिल्लीतील 152 स्क्रीनसाठी जर आपण याची गणना केली तर दिल्ली शहरातूनच अंग्रेजी मीडियमला तीन कोटींवर नुकसान झाले आहे. व्यापार पंडित राज बंसल म्हणतात, 'थिएटरमधील बंदी टाळता येऊ शकते. त्याहून अधिक गर्दी लोकल गाड्या, बसेसमध्ये असते.'

बातम्या आणखी आहेत...