आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Film 'InshaAllah' Stopped Due To Creative Differences Between Salman Bhansali, But Salman Said 'Bhansali Cannot Cheat His Film'

सलमान-भन्साळींमध्ये क्रिएटिव्ह डिफरन्समुळे बंद झाला 'इंशाअल्लाह', सलमान म्हणाला - 'भन्साळी चित्रपटासोबत प्रतारणा करू शकत नाहीत'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सलमान खान आणि आलिया भट्ट स्टारर 'इंशाअल्लाह' क्रिएटिव्ह डिफरन्सचा शिकार झाला आहे. रविवारी रात्री सलमानने ट्विटर लिहिले होते की, चित्रपट पुढे ढकलला गेला आहे. तर सोमवारी दुपारी भन्साळी प्रोडक्शनच्या ट्विटर हँडलवर लिहिले गेले की, "चित्रपट सध्या बंद झाला आहे. याबद्दल अतिरिक्त घोषणा लवकरच समोर येईल." 
 

           

लव्हस्टोरीमध्ये सलमानला हवा होता बदल... 
प्रोडक्शन हाउसशी निगडित असलेल्या सूत्रांनी सांगितले की, सलमानला चित्रपटाच्या लव्हस्टोरीमध्ये काही बदल हवे होते, जे दिगदर्शक संजय लीला भन्साळी यांना मान्य नव्हते. भन्साळी चित्रपटातील आपल्या रचनात्मकतेसाठी ओळखले जातात तर सलमान आपले चित्रपट आपल्यानुसार डिजाइन करणाऱ्या स्टारच्या स्वरूपात प्रसिद्ध आहे. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

यावर सलमाननेही दिली प्रतिक्रिया... 
आता यावर सलमान खानचीही प्रतिक्रिया आली आहे. सलमानच्या सूत्रांनी मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितले. सूत्रांचे म्हणणे आहे की, 'सलमानने चित्रपटाची स्क्रिप्ट बदलण्यासाठी कोणताही दबाव टाकला नाही. भन्साळी आणि सलमान यांनी मिळून चित्रपट आत्ताच न बनवण्याचा निर्णय घेतला आहे.' तसेच सलमानलाही चित्रपटाबद्दल विचारले गेले असता तो म्हणाला, 'खामोशी चित्रपटाच्या आधीपासून संजय आणि मी मित्र आहोत. ते मला मनीषा कोयरालाच्या माध्यमाने भेटले होते. त्यानंतर आम्ही सोबत 'हम दिल दे चुके सनम' मध्ये काम केले. जेव्हा ते हा चित्रपट घेऊन माझ्याजवळ आले तेव्हा तो मला आवडला आणि आम्ही हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. एक गोष्ट म्हणू इच्छितो की, भन्साळी आपल्या चित्रपटासोबत प्रतारणा करू शकत नाही. माझी इच्छा आहे की, त्यांनी हा चित्रपट बनवावा. मित्र म्हणून आमच्यामध्ये काहीही बदललेले नाही. मला अपेक्षा आहे की, संजयच्या मनात माझ्यासाठी तेवढेच प्रेम असेल. मी त्यांची आई आणि बहिणीच्या खूप जवळचा आहे. मला आशा आहे की, आम्ही पुढे 'इंशाअल्लाह' नक्की काम करू.'
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

रविवारी आलियाने शूट केले होते एक गाणे... 
महत्वाची गोष्ट ही आहे की, रविवारी चित्रपटातील एक गाणे आलिया भट्टवर चित्रित केले गेले होते. सोमवारपासून स्वतः सलमानदेखील याच्याशी जोडला जाणार होता. पण एका रात्रीपूर्वीच सलमानने चित्रपट पुढे ढकलला गेल्याची घोषणा केली.  

बातम्या आणखी आहेत...