आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Film Is Being Prepared On KBC's Famous Dialogue, Ayushman Khurana To Speak In Amitabh Bachchan's Voice

'केबीसी' च्या प्रसिद्ध डायलॉगवर बनत आहे चित्रपट, अमिताभ बच्चन यांच्या आवाजात बोलणार आहे आयुष्मान खुराना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : आयुष्मान खुराणाने नुकतीच दिग्दर्शक राज शांडिल्यचा चित्रपट 'ड्रीम गर्ल'ची शूटिंग पूर्ण केली आहे. या चित्रपटानंतर आता तो राजसोबतच आणखी एक चित्रपट करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती 'फॅमिली ऑफ ठाकुरगंज'चे निर्माते अजय सिंह करत आहेत. लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारीही राज शांडिल्यच्याच खांद्यावर असेल. राजने याची कथा आयुष्मानला ऐकवली आहे. त्याला ती आवडली असून तो यावर काम करण्यास तयार झाला आहे. 

 

चित्रपटाची कथा... 
याची कथा एका चाहत्यावर आधारित आहे. तो संकटात सापडल्यानंतर 'नमस्कार, मैं अमिताभ बच्चन बोल रहा हूं.' हा संवाद बोलतो. या संवादामुळे नायक अडचणीत सापडतो. मजेशीर बाब म्हणजे 'ड्रीम गर्ल'सोबतच या चित्रपटातही आयुष्मानचे व्हॉइस मॉड्युलेशन टॅलेंट पाहायला मिळेल. याच कौशल्याच्या बळावर त्याची या चित्रपटासाठी निवडही झाली आहे. 

 

व्हॉइस प्लेची महत्त्वाची भूमिका...  
'ड्रीम गर्ल'मध्ये आयुष्मान मुलीचा आवाज काढून मुलांना आकर्षित करताना दिसेल, तर 'नमस्कार...'मध्ये तो अमिताभचा आवाज काढताना दिसेल. आयुष्मान अभिनेता होण्यापूर्वी आरजे आणि व्हीजे होता. यादरम्यान तो मिमिक्रीदेखील करायचा. त्याचा फायदा त्याला दोन्ही चित्रपटांसाठी होणार आहे. 

 

अमिताभसोबत करतोय 'गुलाबो सिताबो'...  
आयुष्मान सध्या लखनऊमध्ये 'गुलाबो सिताबो'ची शूटिंग करत आहे. यामध्ये तो पहिल्यांदा अमिताभ बच्चनसोबत काम करत आहे. कदाचित आपल्या या आगामी चित्रपटासाठी तो अमिताभ यांची मदत घेऊ शकतो. तो त्यांच्यासोबत काम करत त्यांची व्हॉइस आणि एक्सेंट कॉपी करण्यावर काम करू शकतो. 

स्टार आणि चाहत्याच्या नात्यावर आतापर्यंत 'मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूं' आणि 'फॅन' रिलीज झाले आहेत...