आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, काजोल, ऋतिक रोशन आणि करिना कपूर स्टारर 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटाला रिलीज होऊन आता 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. करण जोहरच्या दिग्दर्शनात बनलेला हा चित्रपट 14 डिसेंबर 2001 ला रिलीज झाला होता. चित्रपटात अचला सचदेव यांनी अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारली होती. पण तुम्हाला माहित आहे का की, या भूमिकेसाठी त्या पहिली पसंती त्या नाही तर वहीदा रहमान होत्या.
पतीच्या निधनानतंर वहीदा यांनी सोडला होता चित्रपट...
वहीदा रहमान यांना चित्रपटासाठी कास्ट केले गेले होते. एवढेच नाही तर त्यांनी काही सीनचे शूटिंगदेखील केले होते. पण यादरम्यान त्यांचे पती कमलजीत यांचे निधन झाले आणि त्यामुळे त्यांनी हा चित्रपट सोडला.
2001 चा सर्वात जास्त कमावणारा चित्रपट बनला...
'कभी खुशी कभी गम' 'कुछ कुछ होता है' नंतर करण जोहरच्या दिग्दर्शनात बनलेला पहिला चित्रपट होता. हा 2001 चा दुसरा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट बनला होता. पहिल्या क्रमांकावर डायरेक्टर अनिल शर्माचा सनी देओल आणि अमीषा पटेल स्टारर 'गदर : एक प्रेमकथा' होता. 'गदर..' ने जिथे 76.88 कोटी रुपये कमावले होते तर 'कभी खुशी..' ने 55.65 कोटींचे कलेक्शन केले होते.
अभिषेक बच्चनने चित्रपटातून हटवला होता आपला सीन...
अभिषेक बच्चनने या चित्रपटाच्या कॅमियोसाठी शूटिंग केले होते. मात्र नंतर त्याने डायरेक्टर करण जोहरला हा सीन फायनल कॉपीमधून हटवायला सांगितला.
आमिर खानला आवडला नव्हता चित्रपट...
आमिर खानने करण जोहरचा शो 'कॉफी विद करन' मध्ये म्हणाले होते की, जेव्हा त्याने स्पेशल स्क्रीनिंगदरम्यान 'कभी खुशी कभी गम' पाहिला होता तेव्हा त्याला तो आवडला नव्हता. तिथे संपूर्ण कास्ट उपस्थित होती. पण जसा चित्रपट संपला तो कुणालाही शुभेछां देता तिथून निघून गेला. त्याने त्यावेळी करण आणि शाहरुखला दुर्लक्षितही केले. मात्र शोदरम्यान त्याने करणची याबद्दल माफीही मागितली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.