आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानच्या हीरोइनने आपल्या पहिल्याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पाहून जाऊन केले होते लग्न, Kiss सीनसाठी लावली गेली होती दोघांच्यामध्ये काचेची भिंत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : सलमान खान आणि भाग्यश्रीची फिल्म 'मैंने प्यार किया' च्या रिलीजला आता 29 वर्ष पूर्ण झाले आहेत. डायरेक्टर सूरज बड़जात्याची ही फिल्म 29 डिसेंबर, 1989 ला रिलीज झाली होती. 29 वर्ष पूर्ण झाल्याने भाग्यश्रीने ट्विटरवर फिल्मचे पोस्टर शेयर करून एक मॅसेज लिहिला आहे, '29 वर्ष पूर्ण झाले आहेत. आणि प्रेम अजूनही चारी बाजूंना आहे'. आज आम्ही तुम्हला या चित्रपटाशी निगडित काही किस्से सांगणार आहोत. भाग्यश्रीची ही डेब्यू फिल्म होती. तसे पाहायला गेले तर सलमानचीही ही डेब्यू फिल्मच होती. कारण याच्याअगोदर आलेली सलमानची फिल्म 'बीवी हो तो ऐसी' मध्ये त्याचा कैमियोच होता. या फिल्मच्या शूटिंगदरम्यानच भाग्यश्रीने आपल्या फॅमिलीच्या विरोधात जाऊन बॉयफ्रेंड हिमालय दासानीसोबत लग्न केले होते. 

 

फिल्मसाठी सलमान डायरेक्टरची पहिली पसंती नव्हता...
- 'मैंने प्यार किया' साठी सलमान खान पहिली पसंती नव्हता. प्रेमच्या लीड रोलसाठी पहिले दीपक तिजोरी आणि विंदू दारा सिंह यांचा विचार केला होता. नंतर सलमानला हा रोल ऑफर झाला होता. त्याला या फिल्मसाठी 'फिल्मफेयर बेस्ट अवॉर्ड मेल डेब्यू' मिळाला होता. 

- फिल्ममध्ये हीरोसाठी सलमान खान आणि मोहनीश बहलने सोबतच ऑडिशन दिल्या होत्या. मात्र, सलमानला लीड रोल आणि मोहनीशला निगेटिव रोलसाठी निवडले गेले. 

 

भाग्यश्रीने किस सीन करायला दिला होता नकार... 
भाग्यश्री खूप साधारण कुटुंबातून आली होती, म्हणून तिने फिल्ममध्ये किसिंग सीन करायला नकार दिला होता. 2015 मध्ये एका इंटरव्यूदरम्यान सलमानने सांगितले होते की, भाग्यश्रीने नकार दिल्यानंतर सूरजने किस सीनमध्ये गोघांच्यामध्ये काचेची भिंत लावण्याची आइडिया दिली होती. 

- फिल्ममधील फेमस अंताक्षरीचे गाणे फायनल करण्यासाठी सूरज बड़जात्याला पूर्ण तीन महिने लागले होते. या अंताक्षरीमध्ये एकूण 19 गाणे होते. 

- सलमानने फिल्ममध्ये जे ब्लॅक लेदर जॅकेट घातले होते, ते सूरज बड़जात्याने हॉलिवूड फिल्म 'टॉप गन' ला पाहून आणले होते. सूरजने अगदी तसेच जॅकेट  डिजाइन करून घेतले होते. 

- फिल्ममध्ये सीमाची बहुमूक करणाऱ्या परवीन दस्तूर मुंबईतल एका थिएटरमधून आली होती. थिएटरमध्ये तिचा अभिनय सूरजला आवडला आहे, ज्यांनंतर त्याने फिल्ममध्ये परवीनला निगेटिव रोल दिला होता. 

 

10 महिन्यात लिहिली होती चित्रपटाची गोष्ट.. 
सूरज बड़जात्याला फिल्मचा स्क्रीनप्ले लिहिण्यासाठी पूर्ण 10 महिने लागले होते. फिल्मचा पहिला हाफ सहा महिन्यात पूर्ण झाला होता तर दुसरा हाफ मात्र चार महिन्यात लिहिला गेला होता. या फिल्ममध्ये मराठी अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांनी हिंदी चित्रपटात डेब्यू केला होता. 

 

बातम्या आणखी आहेत...