आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगनाच्या फिल्मसाठी बजेट काढणेही झाले कठीण, सातव्या दिवशी केवळ इतके कोटींच कमावू शकली 'मणिकर्णिका'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : कंगना रनोटची फिल्म 'मणिकर्णिका' ला रिलीज होऊन एका आठवड्यापेक्षा जास्त वेळ झाला आहे. यादरम्यान फिल्म सतत वादात आहे. मोठ्या बजेटच्या या फिल्मकडून जितक्या अपेक्षा होत्या, त्याप्रमाणे फिल्मची कमाई झाली नाही. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शनुसार, सातव्या दिवशी म्हणजेच गुरुवारी फिल्म केवळ 4.25 कोटींचं कमावू शकली. या आठवड्यात फिल्मची एकूण कमाई 61.15 कोटीपर्यंतच पोहोचली. तसेच फिल्मचे बजेट 125 कोटींच्या आसपास आहे. 

 

आत्तापर्यंत अशी होती फिल्मची कमाई...
 

दिवस      कमाई कोटींमध्ये 
पहिला      8.75
दुसरा      18.10
तीसरा     15.70
चौथा 5.10
पाचवा     4.75
 
सहावा      4.50
सातवा     4.25
 
एकूण कमाई 61.15

 

ओपनिंग डेला मणिकर्णिकाने सुमारे 8.75 कोटींचा बिजनेस केला होता. त्यांनतर दुसऱ्या दिवशी प्रजासत्ताक दिनामुळे फिल्मची कमाई वाढली आणि 18.10 कोटींचे कलेक्शन झाले. मात्र, तिसऱ्या दिवशी पुन्हा ग्राफ कमी झाला आणि फिल्म 15.70 कोटींचे कलेक्शन करण्यात यशस्वी झाली. त्यांनतर फिल्मच्या कलेक्शनचा ग्राफ सतत खालावत आहे. 

 

डायरेक्टर कृषने सांगितला कंगनाच मनमानी कारभार...
फिल्म रिलीजच्या दोन दिवसानंतर डायरेक्टर कृषने कंगनाविरुद्ध वक्तव्य केले आहे आणि त्याने कंगनाबद्दलचे अनेक खुलासे केले होते. त्याने आरोप केला की, फिल्मच्या डायरेक्शनमध्ये कंगनाने खूप इंटरफेयर केले. तिला सगळेच करायचे होते. एवढेच नाही तर ती त्याच्यावर ओरडायचीही. स्वतःचा रोल मोठा करण्यासाठी तिने इतर स्टार्सचे रोल कमी केले.

 

डायरेक्शनमध्ये क्रेडिट घेतल्यामुळेही भडकला कृष...
- कृषने मीडियाला दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये सांगितले, 'फिल्मचे जेव्हा पहिले पोस्टर आणि टीजर रिलीज केला गेला होता, तेव्हा त्यामध्ये माझेही नाव होते. पण तसे दिले गेले नव्हते जसे इतर चित्रपटात दिले जाते. माझे नाव दिले होते राधा कृष्णा जगरलामूदी, जे मी कधीच यूज करत नाही. जेव्हा मी ते चेंज करायला सांगितले तेव्हा कंगना माझ्यावर नाराज झाली. जोर जोरात माझ्यावर ओरडू लागली'. कृषने सांगितले, 'मी जेव्हा फिल्म पहिली तेव्हा माझे नाव वेगळे दिले गेले होते. कंगनाने आपले नाव डायरेक्शनच्या क्रेडिटमध्ये दिले होते, जेव्हा तिला याच काहीही अधिकार नाहीये'


कंगनाच्या मनमानीमुळे वाढले फिल्मचे बजेट...
कृषचे म्हणणे आहे की, फिल्मची एडिटिंग जूनमधेच पूर्ण झाली होती. सर्व स्टार्सने आपले डबिंगही पूर्ण केले होते. फक्त कंगनाच्या वाट्याचे डबिंग बाकी होते कारण ती आपली फिल्म 'मेंटल है क्या' च्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. तिने परत आल्यावर फिल्म पहिली तर तिला ती आवडली नाही. तिला त्यांमध्ये काही बदल करून हवे होते. काही काळानंतर म्हणू लागली की, याची भूमिका मोठी, त्याचे पात्र जास्त चांगले आहे. हे चेंज करावे लागेल. फिल्मचे अनेक भाग परत शूट केले गेले. सुरुवातीला फिल्मचे बजेट 60 कोटी रुपये होते. पण कंगनाच्या जिद्दीमुळे अनेक सीन्स परत शूट करावे लागले आणि बजेट वाढून 125 कोटी झाले.
 

बातम्या आणखी आहेत...