आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Film 'Saho's Future City Was Set Up In The Desert At A Cost Of Rs 65 Crore, A Team Of 300 Artists Took Two Years To Design.

65 कोटी रुपये खर्च करून वाळवंटात रचला गेला 'साहो'च्या फ्यूचर सिटीचा सेट, डिजाइन करण्यासाठी 300 कलाकारांच्या टीमला लागली दोन वर्षे  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : प्रभासचा आगामी मैग्नम ओपस चित्रपट 'साहो' च्या काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या टीजरमध्ये आपल्याला एक अत्याधुनिक शहर पाहायला मिळाले होते. हे एका अशा अकल्पनीय मॉडर्नसिटी सारखे दिसते, जसे जगात आजपर्यंत कधीच पहिले गेले नाही. गगनभेदी इमारतींच्या आभासी जगात या चित्रपटाचे अनोखे अॅक्शन सिन चित्रित केले गेले आहेत. या शहरात प्रभास बाइक चेजिंग सीनमध्ये आपल्या अॅक्शनची ताकद दाखवणार आहे. तुम्हला माहित आहे का की, हे अविश्वसनीय जग अबू धाबीच्या वाळवंटामध्ये 65 कोटी रुपये खर्च करून क्रिएट केले गेले आहे. हे काम केले आहे, या चित्रपटाचे प्रोडक्शन डिजाइनर साबू सिरिलने. 

 

खर्चिक सेट्समुले वाढले बजेट... 
35% वीएफएक्स..  
65% रियल..  
बॅटमॅन सीरीजच्या गोथम सिटीपासून इंस्पायर्ड यूएईच्या वाळवंटात ही सिटी बनवण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेता प्रोडक्शन डिजाइनर साबू यांना पूर्ण दोन वर्षांचा कालावधी लागला. त्यांनी बॅटमॅन सीरीजमध्ये दाखवल्या गेलेल्या गोथम शहराचे उदाहरण समोर ठेवले होते. अशा खर्चिक सेट्समुळेच 'साहो' खूप महागडा चित्रपट बनला आहे. 

 

टीम बिल्डिंगमध्ये प्रभासचे म्हणणे राखले गेले.. 
स्पेशल इफेक्ट्स सुपरवायजर डॅनिलो बोले टिनी, ज्यांनी यापूर्वी 'वंडर वुमन '(2017) आणि 'अॅव्हेंजर्स : एज ऑफ अल्ट्रॉन' (2015) मध्ये काम केले आहे, तेदेखील या प्रोजेक्टमध्ये जोडले गेले आहेत. व्हीएफएक्स सुपरवायजर कमलाकन्नन आणि त्यांच्या टीमला विशेषतः प्रभासच्या म्हणण्यावर चित्रपटाशी जोडले गेले. 

 

जगातील बेस्ट टेक्नीशियन जोडले... 
असे नाही की, सिटीचा सेट बनवण्याचे टास्क केवळ सेट डिजायनर्सच्या भरवश्यावर होते. या कामामध्ये व्हिज्युअल इफेक्ट्स आर्टिस्ट आणि डिजिटल कंपोजिटर्स यांचीदेखील मदत घेतली गेली. जगातील सर्वश्रेष्ठ इंटरनॅशनल टेक्नीशियनदेखील या कामामध्ये सामील केले गेले.