आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉक्सऑफिस : 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' वर भारी पडला चित्रपट 'उरी -सर्जिकज स्ट्राइक', पहिल्याच दिवशी कमवले 8.25 कोटी रुपये, दोन्ही चित्रपट एकाच दिवशी झाले होते रिलीज  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : विक्की कौशल, यामी गौतम आणि परेश रावल स्टारर 'उरी' ला बॉक्सऑफिसवर चांगली सुरुवात मिळालाय आहे. वेबसाइट बॉक्सऑफिसइंडियाच्या रिपोर्टनुसार, फिल्मने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 8 ते 8.25 कोटी रुपयांचा बिजनेस केला आहे. यासोबतच सुरु झालेल्या फिल्म 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' ने पहिल्या दिवशी 3.25 ते 3.50 कोटी रुपये कमावले. या फिल्ममध्ये अनुपम खेर यांनी मनमोहन सिंह यांची भूमिका साकारली आहे.  

 

'उरी' वॉर ड्रामा तर बायोपिक आहे 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर'
सर्जिकल स्ट्राइकवर बनला आहे 'उरी'

आदित्य धर यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट 'उरी' एक वॉर ड्रामा आहे, ज्यामध्ये 2016 मध्ये इंडियाने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइक ऑपरेशन दाखवले गेले आहे. ही स्ट्राइक उरी बेस कॅम्पमध्ये भारतीय सैनिकांवर झालेल्या आतंकवादी हल्ल्याचा बदला आहे. 

 

संजय बारू यांच्या पुस्तकावर बनली आहे 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर'
विजय गुट्टे यांच्या दिग्दर्शनात बनलेली 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या आयुष्यावर आधारित आहे. हा चित्रपट त्यांचे  मीडिया सल्लागार संजय बारू यांचे 2014 मध्ये आलेले पुस्तक 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर'वर आधारित आहे. फिल्ममध्ये अक्षय खन्नाने संजय बारूचा रोल केला आहे. फिल्म ट्रेलर रिलीजदरम्यानच वादात अडकली होती. 

बातम्या आणखी आहेत...