Home | Gossip | Filmfare criticised for editing Disha Patani Pics to make breasts bigger

फरक ओळखा पाहू... दिशा पटानीचा तो वादग्रस्त फोटो निघाला Fake! अॅक्ट्रेसने केला फोटोशॉपचा दावा; यूझर्सला प्रश्न, यात खरा-खोटा कोणता...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 07, 2018, 03:25 PM IST

दिवाळी निमित्त असे कपडे घालण्यावरून काही यूझर्स तिच्यावर भडकले होते.

  • Filmfare criticised for editing Disha Patani Pics to make breasts bigger

    मुंबई - टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पाटानीच्या ज्या दिवाळी फोटोवरून वाद झाला तो प्रत्यक्षात फेक निघाला आहे. या फोटोमध्ये तिने घागरा आणि स्पोर्ट्स ब्रा घालून हातात एक दिवा घेत पोझ केले होते. तिच्या खांद्यावर ओढणी सुद्धा होती. दिवाळी निमित्त असे कपडे घालण्यावरून काही यूझर्स तिच्यावर भडकले होते. काहींनी तर तिला दिवाळीला कसे कपडे घालावे असे उपदेशही दिले होते. यानंतर दिशाने फोटो टवून नवीन फोटो अपलोड केला आहे. यापूर्वी अपलोड करण्यात आलेला फोटो हा फेक होता असे तिने सांगितले. प्रत्यक्षात पहिला फोटो फिल्मफेअर मॅगझीनने तयार केला होता. तो फोटोशॉप करून विचित्र बनवण्यात आला होता असा आरोप आहे. परंतु, मॅगझीनने हा आरोप फेटाळून लावला आहे.

    कोणता खरा आणि कोणता खोटा?
    दिशा पाटानीने पहिला अर्थात मॅगझीनने बनवलेला फोटो डिलीट करून त्या ठिकाणी नवीन फोटो अपलोड केला आहे. या फोटोमध्ये पहिल्या नजरेत काहीच फरक दिसत नाही. परंतु, बारकाईने पाहिल्यास आधीच्या फोटोमध्ये दिशाची फिगर मुद्दाम आकर्षक करण्यात आली असे दिसून येते. दिशाने शेअर केलेला आधीचा फोटो पाहिल्यास त्यामध्ये दिशाची फिगर विशिष्ट फोटोशॉप करून वाढवण्यात आली होती. तर नवीन फोटोमध्ये दिशा पटाणीची फिगर कमी दिसून येते. आता यूझर्सला आणखी एक प्रश्न पडलाय की फोटोशॉप मॅगझीनने केला होता की लोकांचा संताप पाहून दिशानेच फोटोशॉप करून कमी रिव्हीलिंग फोटो शेअर केला?

Trending