आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Filmfare Glamour And Style Award Alia Bhatt Cute Chemistry With Varun Dhawan On The Red Carpet

पिंक अँड ब्लॅक आउटफिटमध्ये दिसला आलियाचा स्टनिंग लूक, रेड कार्पेटवर वरुणसोबत दिसली क्यूट केमिस्ट्री

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री आलिया भट आणि वरुण धवन यांनी 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून अभिनय करिअरचा श्रीगणेशा केला. या चित्रपटानंतर दोघे 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया', 'बद्रीनाथ की दुल्हनिया', 'कलंक' या चित्रपटांमध्ये एकत्र दिसले. या चित्रपटांमध्ये दोघांची क्युट केमिस्ट्री बघायला मिळाली होती. त्यांची ही केमिस्ट्री त्यांचे चाहते पसंत करतात.


अलीकडेच पुन्हा एकदा दोघांचा खास अंदाज बघायला मिळाला. हे दोघेही मंगळवारी रात्री मुंबईत पार पडलेल्या फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाइल अवॉर्ड शोमध्ये पोहोचले होते. यावेळी आलिया तिचा बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत नव्हे तर वरुणसोबत वेळ घालवताना दिसली. पिंक अँड ब्लॅक कलरच्या आउटफिटमध्ये आलिया स्टनिंग दिसली. साजेसा मेकअप, ओपन हाफ कर्ली हेअरने तिने आपला हा लूक पूर्ण केला होता. तर वरुण शर्ट आणि व्हाइट पँटमध्ये हॅण्डसम दिसला.


यावेळी दोघेही रेड कार्पेटवर मस्तीच्या मूडमध्ये दिसले. दोघांनीही मस्तीच्या मूडमध्ये कॅमे-यासमोर पोज दिल्या. आलिया आणि वरुणच्या छायाचित्रांना त्यांचे चाहते पसंतीची पावती देत आहेत.   

आलिया आणि वरुणच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाल्यास सध्या आलिया 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी आहे. तिच्यासोबत रणबीर कपूर, अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय यांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय आलिया करण जोहरच्या मल्टीस्टारर 'तख्त' आणि 'सडक 2' मध्ये झळकणार आहे. तर वरुण सध्या 'कुली नंबर 1' चे चित्रीकरण करतोय.  याशिवाय 'स्ट्रीट डान्सर' हा आणखी एक प्रोजेक्ट त्याच्याकडे आहे.