आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Filmfare Glamour And Style Award Varun Anushka Most Glamorous Star While Ayushman Aliya Becomes The Most Stylish Star

वरुण-अनुष्का मोस्ट ग्लॅमरस तर आयुष्मान-आलिया ठरले मोस्ट स्टायलिश स्टार, बघा रेड कार्पेटवरील स्टार्सचा जलवा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर डावीकडून - क्रिती सेनॉन, आयुष्मान खुराणा, अनुष्का शर्मा, सोफी चौधरी, खाली - डावीकडून - सैफ अली खान, शरद केळकर आणि नीना कुलकर्णी, सनी लिओनी, आलिया भट आणि वरुण धवन - Divya Marathi
वर डावीकडून - क्रिती सेनॉन, आयुष्मान खुराणा, अनुष्का शर्मा, सोफी चौधरी, खाली - डावीकडून - सैफ अली खान, शरद केळकर आणि नीना कुलकर्णी, सनी लिओनी, आलिया भट आणि वरुण धवन

एंटरटेन्मेंट डेस्कः मुंबईत मंगळवारी रात्री सहाव्या फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाइल अवॉर्ड सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अवॉर्ड शोच्या रेड कार्पेटवर बॉलिवूड, टीव्ही इंडस्ट्री आणि वेब सीरिजमध्ये काम करत असलेल्या स्टार्सचा जलवा बघायला मिळाला.  आलिया भट, कृती सेनॉन, कार्तिक आर्यन, आयुष्मान खुराणा, वरुण धवन, राजकुमार राव, मलायका अरोरा, सैफ अली खान, रकुल प्रीत सिंह आणि यामी गौतमसह अनेक स्टार्स रेड कार्पेटवर अवतरले होते. या अवॉर्ड सोहळ्यात अनुष्का शर्माला मोस्ट ग्लॅमरस फिमेल स्टार आणि आलिया भटला मोस्ट स्टायलिश फिमेल स्टारचा अवॉर्ड देण्यात आला. तर वरुण धवन मोस्ट ग्लॅमरस मेल स्टार आणि आयुष्मान खुराणा मोस्ट स्टायलिश मेल स्टार ठरले.

  • या सेलिब्रिटींना मिळाला अवॉर्ड
स्टार     अवॉर्ड
सैफ अली खान   स्टाइल आयकॉन ऑफ द ईयर
राजकुमार राव    रिस्क टेकर ऑफ द ईयर
अनन्या पांडे    इमर्जिंग फेस ऑफ फॅशन
दीया मिर्झा    वुमन ऑफ स्टाइल अँड सब्सटेंस
कृती सेनॉन    फिट अँड फॅबुलस 
कियारा आडवाणी    हॉटस्टेपर ऑफ द ईयर (फिमेल)
कार्तिक आर्यन    हॉटस्टेपर ऑफ द ईयर (मेल)
मनीष मल्होत्रा   द स्पेशलिस्ट
मलायका अरोरा    दिवा ऑफ द ईयर
करण जोहर   ट्रेलब्लेजर ऑफ फॅशन

बातम्या आणखी आहेत...