आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिल्म डायरेक्टर कल्पना लाजमी यांचे निधन, दोन आजारांमुळे गमावले प्राण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: फिल्ममेकर कल्पना लाजमी यांचे आज (रविवार) निधन झाले. त्या 64 वर्षांच्या होत्या. कल्पना वर्षभरापासून किडनी कँसरवर उपचार घेत होत्या. त्यांना धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज सकाळी 4.30 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांची तब्येत जास्त खराब होती. कल्पना यांना किडनीसोबतच लिव्हरची समस्यादेखील होती.
 
1 वाजता होणार अंत्यसंस्कार 
- कल्पना यांनी जास्तीत जास्त महिला केंद्रित चित्रपट बनवले होते. त्यांनी 'एक पल', 'रुदाली', 'चिंगारी', 'क्यों' सारखे चित्रपट बनवले. त्यांनी टीव्ही सीरियल 'लोहित किनारे'चे डायरेक्शन केले होते.
- 2006 नंतर त्यांनी कोणत्याच चित्रपटाचे डायरेक्शन केले नव्हते. त्या पेंटर ललिता लाजमी आणि प्रसिध्द डायेरक्टर गुरु दत्त यांच्या पुतणी होत्या.
- कल्पना यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. हुमा कुरैशी, सोनी राजदानसोबतच अनेक सेलेब्सने त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करुन त्यांन ट्विटरवरुन श्रध्दांजली वाहिली आहे. 

 

 

I will miss her strong energetic voice, her indefatigable drive to create, her laughter that was always so full of real joy and her wonderful sense of humour. Most of all I will miss my movie partner. Cant believe you’re gone Kalpana. RIP sweetheart ❤️ pic.twitter.com/kJFCKtct7e

— Soni Razdan (@Soni_Razdan) September 23, 2018

Saddened by the passing away of acclaimed filmmaker, producer & screenwriter Kalpana Lajmi, who stood for breaking new ground in Indian cinema with films like ‘Rudaali’. My condolences to her family and admirers

— Mamata Banerjee (@MamataOfficial) September 23, 2018

You will be missed Kalpanaji.Was not your time to go..but may your heart now be at peace.🙏🏻🕉🙏🏻 . Those days while shooting Daman will be a treasured memory. #KalpanaLajmi Om Shanti. pic.twitter.com/mtteS4nAlZ

— Raveena Tandon (@TandonRaveena) September 23, 2018
बॉलिवूड सेलेब्स करत होते सपोर्ट
काही महिन्यांपुर्वी त्याचे पती संगीतकार भूपेन हजारिका यांच्या पुण्यतिथीचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांची तब्येत बिघडली. तेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. कल्पना यांचे आठवड्यातून चारवेळा डायलिसिस होत होते. त्यांच्या डायलिसिसचा खर्च अनेक सेलेब्स मिळून करत होते. आमिर खान, सलमान खान, आलिया भट, करण जोहर, नीना गुप्ता यांची नाव या लिस्टमध्ये आहेत. त्यांनी फायनेंशियल सपोर्टसाठी सर्वांचे आभारही मानले होते. 2011 मध्ये संगीतकार भूपेन हजारिका यांचे निधन झाले होते. 

 

 

'रुदाली' साठी मिळाला होता राष्ट्रीय पुरस्कार 
कल्पाना यांना 1993 मध्ये आलेल्या 'रुदाली' चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटासाठी डिंपललादेखील बेस्ट अॅक्ट्रेसचा नॅशनल अवॉर्ड मिळाला होता. चित्रपटात डिंपल कपाडिया, राखी, राज बब्बर, अमजद खान प्रमुख भूमिकेत होते. यासोबतच 66 व्या अकादमी अवॉर्ड्समध्ये 'रुदाली' चित्रपटाला बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म कॅटेगिरीमध्ये एंट्री मिळाली होती. यासोबतच कल्पना यांच्या 2001 मध्ये आलेल्या 'दमन' चित्रपटासाठी रवीना टंडनला बेस्ट अॅक्ट्रेसचा नॅशनल अवॉर्ड मिळाला होता. 
 

 

बातम्या आणखी आहेत...