आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीरियड ड्रामा फिल्म बनवणार करण जोहर, दिसणार दारा शिकोह आणि औरंगजेब यांचे युध्द

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: काही वर्षांपुर्वी आशुतोष गोवारिकर यांनी 'जोधा अकबर' बनवला होता. गेल्यावर्षी संजय लीला भन्साळीने अल्लाउद्दीन खिलजी आणि राणी पद्मावतवर 'पद्मावत' चित्रपट बनवला. दोन्हीही चित्रपट यशस्वी ठरले. आता करण जोहर दारा शिकोह आणि औरंगजेबच्या युध्दावर चित्रपट बनवणार असे बोलले जातेय. 


औरंगजेबाच्या नावासाठी रणवीर सिंहचे नाव समोर आले आहे. दारा शिकोहसाठी रणबीर कपूरचे नाव आहे. हा चित्रपट दोन हिरो आणि तीन हिरोइन्सची कथा असणार आहे. हीरोइनसाठी फ्रंटवर आलिया भट्ट आणि करीना कपूर खानला साइन करण्यात आले आहे. तिसरी हिरोइन एक नवीन चेहरा कास्ट करण्यात येईल. 


ही सर्व माहिती चित्रपटासंबंधीत लोकांनी दिली आहे. धर्मा प्रोडक्शंस आणि करण जौहरकडून याविषयी ऑफिशिअल अनाउंसमेंट अजून झालेली नाही. सूत्रांनी सांगितले आहे की, चित्रपटाचे डायरेक्शन करण जोहर स्वतः करणार आहे. हा धर्मा प्रोडक्शनच्या इतिहासातील सर्वात महागडा चित्रपट असेल. खिलजीनंतर रणवीर सिंह पुन्हा एकदा निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. 


दारा शिकोहविषयी 
- दारा शिकोह यांचा उल्लेख इतिहासात आहे. तसा चित्रपटातही असेल. दारा शिकोह हा शाहजहांचा मुलगा होता. शाहजहां यांना शिकोहला मुगल वंशाचा पुढचा बादशाह बनवायचे होते. शिकोहमध्ये बादशाहचे पुर्ण गुण होते. तो सूफीवादी आणि हनफी पंथाचा अनुयायी होता. तो सर्व प्रदेशांचा आदर करायचा. सर्व धर्मांच्या दर्शनामध्ये त्याला रस होता. परंतू त्याला त्याच्या उदार विचारामुळे नुकसान झाले. औरंगजेबने दारा शिकोहला इस्लामचे गुन्हेगार सिध्द केले. 

- शेवटी 1658 मध्ये दाराला धर्म युध्द आणि सामूगढच्या लढाईमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. 9 सप्टेंबर 1659 ला शिक्षा म्हणून दारा शिकोहचे शिर कापण्यात आले. औरंगजेबाने त्याचा मुलगा सुलेमानची तुरुंगात हत्या केली. 
- ट्रेड एनालिस्टनुसार 'पद्मावत'मध्ये रणवीर सिंहने खिलजीची निगेटिव्ह भूमिका साकारली होती. यामुळे करण जोहर रणवीर सिंहला औरंगजेबाची भूमिका देण्यास प्रेरित झाला आहे. दारा शिकोहसाठी करणच्या नजरेत रणबीर कपूर होता. अजून रणबीरकडून कोणतेही कन्फर्मेशन आलेले नाही. यावर करण जोहरच्या प्रवक्त्याला विचारण्यात आल्यावर त्यांनी सांगितले की, जे फायनल होईल, ते अनाउंस करण्यात येईल. 

बातम्या आणखी आहेत...