MI 17 / ‘ते’ भारतीय हेलिकॉप्टर हवाईदलामुळेच पडले, एमआय-17 अपघाताच्या चौकशीतील तथ्य

या हेलिकॉप्टरची मित्र व शत्रूपक्ष ही ओळख सांगणारी यंत्रणा बंद होती का?

वृत्तसंस्था

May 22,2019 08:54:00 AM IST

नवी दिल्ली - बालाकोट एअरस्ट्राईकच्या दुसऱ्या दिवशी २७ फेब्रुवारीला भारत-पाकदरम्यान तणाव असताना भारताचे अपघातग्रस्त एमआय-१७ हे लढाऊ हेलिकॉप्टर भारतीय हवाईदलानेच डागलेल्या एका क्षेपणास्त्राचे लक्ष ठरले होते. अपघाताचे हेच कारण असल्याचे आता मानले जात आहे.


सूत्रांनुसार, ज्या वेळी क्षेपणास्त्र डागले गेले तेव्हा एअर डिफेन्स सिस्टीमध्ये तैनात असलेल्या लोकांसह इतर अधिकाऱ्यांवर याची चौकशी केंद्रित करण्यात आली आहे. या अपघाताची कोर्ट ऑफ इन्क्वायरी सुरू आहे. दरम्यान, श्रीनगरच्या एअर आफिसर कमांडिंगची बदली करण्यात आली आहे. या हेलिकॉप्टरची मित्र व शत्रूपक्ष ही ओळख सांगणारी यंत्रणाही (आयएफएफ : आयडेंटिफिकेशन ऑफ फ्रेंड अँड फो) बंद होती का, याचीही चौकशी केली जात आहे.


पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाईदलाने बालाकोटमध्ये जैशच्या तळांवर हल्ले केले. यानंतर पाकिस्तानी विमानांनी काश्मीरमध्ये हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. यादरम्यान, भारताचे एमआय-१७ हेलिकॉप्टर कोसळले. यात हेलिकॉप्टरमधील कारपोरल दीपक पांडेय यांच्यासह पाच जण शहीद झाले होते.

X
COMMENT