आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Final Judgment On Ram Mandir On 17 November, Supreme Court Chief Justice Ranjan Gogoi Predicts

राम मंदिराचा निकाल 17 नोव्हेंबरला लागू शकतो! सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश गोगोई यांना अपेक्षा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अयोध्येत राम जन्मभूमी प्रकरणाची 26 व्या दिवशीची सुनावणी झाली. यावर आता सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, अयोध्या प्रकरणी सर्वच पक्षांना मिळून प्रयत्न करावा लागेल. सोबतच, पक्षकारांनी ठरवून कोर्टाला त्यासंदर्भात माहिती द्यावी. या प्रकरणाची सुनावणी 18 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार अशी शक्यता आहे. यानंतर निकाल लिहिण्यासाठी न्यायाधीशांना 4 आठवडे लागतील. त्यातही पक्षकारांना मध्यस्थी किंवा इतर पर्याय मान्य असतील तर ते देखील न्यायालयास सूचवावे असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले.

रिटायरमेंटच्या दिवशी राम मंदिरचा निकाल!
सरन्यायाधीश गोगोई यांनी सांगितले, की ''मध्यस्ती संदर्भात पॅनलचे पत्र मिळाले आहे. जर आपसात चर्चेतून तोडगा निघत असेल तर ते कोर्टास कळवावे. मध्यस्थी देखील केली जाऊ शकते. मध्यस्ती संदर्भात गुप्तता बाळगली जाईल असे त्यांनी आश्वस्त केले आहे. सुप्रीम कोर्टाने पुढे सांगितले, की या दरम्यान सुनावणी सुरूच राहील. सुनावणी आता पुढे गेली असून ती सुरूच राहील. अर्थात 17 नोव्हेंबर पर्यंत यावर निकाल येईल. उल्लेखनीय बाब म्हणजे, गोगोई याच दिवशी निवृत्त होत आहेत.

हायकोर्टाने 2010 मध्ये दिला होता हा निकाल
2010 मध्ये अलाहाबाद हायकोर्टाने अयोध्या प्रकरणात आपला निकाल जारी केला होता. त्याच निकालाच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकांवर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. हायकोर्टाने त्यावेळी दिलेल्या निकालानुसार, अयोध्येचा 2.77 एकर परिसर तीन भागांमध्ये विभाजित केले जावा. यात सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही अखाडा आणि रामलला विराजमान यांच्यात वाटली जाईल.

बातम्या आणखी आहेत...