आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'दादा मी प्रेग्नंट आहे\', या होर्डिंग्जचे गुपित उलगडले; मुंबईसह पुण्यात रंगली होती चर्चा!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उमेश कामत आणि हृता दुर्गुळे ही जोडी भाऊ-बहीण म्हणून पडद्यावर दिसणार
  • होर्डिंग्ज प्रियाच्या नाटकाचा प्रमोशनचा भाग

मुंबई- मागील काही दिवसांपासून मुंबईसह पुणे शहरांत विविध ठिकाणी 'दादा मी प्रेग्नंट आहे' असे शीर्षक लिहिलेले भले मोठे होर्डिंग्जनी लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. नेमके हे होर्डिंग कशाचे, असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. एवढेच नाही तर लोकांमध्ये या होर्डिंग्जविषयी तर्कवितर्कही काढले जात होते. मात्र, दादा मी प्रेग्नंट आहे.. या होर्डिंग्ज मागील गुपित अखेर उलगडले आहे. एका नाटकाच्या प्रमोशनचा भाग म्हणून मुंबईसह पुण्यात होर्डिंग लावण्यात आले आहेत.

 

'दादा मी प्रेग्नंट आहे' होर्डिंग्ज अभिनेत्री प्रिया बापटच्या 'दादा, एक गुड न्युज आहे' या आगामी नाटकाचे असून ती स्वत: याची निर्मिती करत आहे. उमेश कामत आणि हृता दुर्गुळे ही जोडी भाऊ-बहीण म्हणून पडद्यावर दिसणार आहे. प्रियाने नुकतेच काही दिवसांपूर्वी आपल्या इन्स्टाग्रामवर 'एक गूड न्यूज आहे' अशी पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर हे होर्डिंग्ज प्रियाच्या नाटकाचा प्रमोशनचा भाग असल्याचे समजल्याने लोकांच्या मनात निर्माण झालेली उत्सुकता कमी झाल्याचे दिसत आहे.

 

हे नाटक सोनल प्रॉडक्शनची निर्मिती असून कल्याणी पठारे यांनी याचे लिखाण केले आहे. नंदू कदम हे या नाटकाचे निर्माते असून अद्वैत दादरकर यांनी दिग्दर्शन आहे. या नाटकात आरती मोरे, ऋषी मनोहर आणि जयंत घाटे या कलाकारांसोबत अनेक जणांचा समावेश असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...