आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघिणीला मारण्यासाठी आलेल्या शार्पशूटरला अखेर माघारी पाठवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडाच्या जंगलातील नरभक्षक वाघिणीला मारण्यासाठी वन विभागाने बोलावलेला शार्पशूटर शहाफत अली खानला परत हैदराबादला जाण्याचे आदेश केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री मनेका गांधी यांनी दिले आहेत. 


शिकारी शहाफत अली खानची माफी मागण्यासाठी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. के. मिश्रा यांनी दाेन दिवसांपूर्वी यवतमाळच्या पांढरकवडा क्षेत्राच्या महिला उपवनसंरक्षक के. एल. अभर्णा यांना रात्री शहाफतच्या हाॅटेलात पाठवले होते. गंभीर दखल घेत मनेका गांधी यांनी राष्ट्रीय महिला आयोगाला या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सांगितले. त्याबाबत अहवाल आल्यानंतर तडकाफडकी शहाफतला परत पाठवण्यात आले. त्याला माघारी पाठवले जावे यासाठी प्राणी मित्रांनी आंदोलन पुकारले होते. नागपुरच्या महाराजबाग भागात यासाठी मोर्चाही काढण्यात आला होता. त्यामुळेच त्याला माघारी पाठवण्यात आले आहे . 

बातम्या आणखी आहेत...