आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अन् फायनान्स कंपनीने शिवशाही बस रोखली, अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथील प्रकार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - पुणे ते अमरावती या शिवशाही बसला फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे रोखल्याची माहिती आहे. फायनान्स कंपनीकडून करण्यात आलेल्या कारवाईने प्रवाशांचा मात्र चांगलाच खोळंबा झाला. बोरगाव मंजू येथून अन्य बसची व्यवस्था केल्यानंतर प्रवासी अमरावतीला पोहोचले. फायनान्स कंपनीने केलेल्या कारवाईमुळे शिवशाहीचे “नाक’ कापले गेल्याची चर्चा होत आहे.

पुणे येथून अमरावतीकरिता निघालेली शिवशाही स्लीपर बस अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजूच्या जवळ पोहोचली. या वेळी अचानक फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ही बस रोखली. काही जणांनी अचानक बस रोखल्याने काही क्षण प्रवासी घाबरले. मात्र, फायनान्सच्या तांत्रिक कारणाने बस रोखण्यात आल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली. 

नागपूर येथील जय ग्रुपकडून खासगी शिवशाही बस चालवली जात आहे. फायनान्स कंपनीकडून ही कारवाई करण्यात आल्यानंतर त्या शिवशाही बसमधील प्रवाशांना अमरावती येथे आणण्याकरिता महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाला स्वतंत्र व्यवस्था करावी लागली. फायनान्स कंपनीकडून केलेल्या या कारवाईमुळे खासगी शिवशाहीचे नाक कापले गेल्याची चर्चा प्रवाशांमध्ये होती. 

या कारवाईची माहिती मिळताच शिवशाही बस मधील प्रवाशांना अमरावती येथे आणण्याकरिता अन्य बसची व्यवस्था केल्याची माहिती अमरावतीचे आगार प्रमुख नितीन जयस्वाल यांनी दिली. मात्र, खासगी शिवशाही चालविणारे जय ग्रुप नागपूरचे अभिलाष मालवीय यांनी फायनान्स कंपनीची कारवाई नसून ब्रेक डाऊन झाल्याचे सांगितले. शिवाय शिवशाही बस अमरावती आगारात असल्याची माहिती दिली.

0