आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीतारमण यांनी परंपरा मोडीत काढत 'फोल्डर'मध्ये आणला अर्थसंकल्प, आतापर्यंत सुटकेसमध्ये आणला जायचा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आतापर्यंत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना सर्व अर्थमंत्री एका बजेट सुटकेससोबत येत असत. ती कधी काळ्या रंगाची होती, तर कधी लाल रंगाची. यावेळी मात्र सीतारमण यांनी परंपरा मोडीत काढत अर्थसंकल्पासाठी सुटकेस ऐवजी लाल रंगाचे फोल्डर वापरले. दरम्यान ही भारतीय परंपरा आहे. तसेच हे पाश्चिमात्य मानसिकतेच्या गुलामीतून बाहेर पडण्याचे प्रतिक आहे. तुम्ही याला बजेट ऐवजी 'वहीखातं' म्हणू शकता असे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ति सुब्रमण्यम यांनी सांगितले.


दरवर्षी अर्थसंकल्प सादर करतेवेळी अर्थमंत्री सुटकेससोबत माध्यमांना फोटोसाठी पोज देतात. पण सीतारमण यांनी मात्र यात बदल केला. अर्थमंत्री संसद भवनात जाण्यापूर्वी आपल्या अर्थसंकल्पीय टीमसह मंत्रालयाबाहेर दिसून आल्या. यावेळी त्यांच्या हातात सुटकेसऐवजी लाल रंगाची फोल्डर बॅग होती. त्यावर अशोक स्तंभाचे चिन्ह दिसत होते. इतक्या वर्षांत हा बदल प्रथमच पाहायला मिळाला.  

 

बजेट बॅगचा इतिहास
स्वातंत्र्यानंतर 26 नोव्हेंबर 1947 रोजी देशाचा पहिला अर्थसंकल्प सादर झाला तेव्हा तत्कालीन अर्थमंत्री आर.के. शण्मुखम शेट्टी यांनी अर्थसंकल्पाची कागदपत्रे ठेवण्यासाठी लेदर बॅगचा उपयोग केला होता. 

 

> आतापर्यंत अर्थसंकल्पासाठी वापरण्यात येणाऱ्या बॅगचा आकार सारखाच होता पण रंग मात्र अनेकदा बदलाल गेला. 1991 मध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काळ्या रंगाच्या बॅगेत मोठे आर्थिक बदल आणणारा अर्थसंकल्प सादर केला होता.


> पंडित नेहरू, यशवंत सिन्हा यांनीही काळ्या बॅगचा उपयोग केला होता. प्रणब मुखर्जी यांनी लाल रंगाची बॅग वापरली होती. तर माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तपकिरी आणि लाल रंगाच्या बॅगेत अर्थसंकल्प सादर केला होता. यावर्षी अंतरिम बजेट सादर करणारे अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी लाल सुटकेसचा उपयोग केला होता.