Home | International | Pakistan | Finance minister of Pakistan statement is economy of Pakistan will collapse

पाक दिवाळीखोरीच्या उंबरठ्यावर; अर्थमंत्री असद उमर यांनी दिली कबुली

वृत्तसंस्था | Update - Apr 05, 2019, 11:11 AM IST

एफएटीएफ काळ्या यादीत टाकण्याची शक्यता

  • Finance minister of Pakistan statement is economy of Pakistan will collapse

    इस्लामाबाद - दहशतवादावरून भारतासह आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानवर महागाईचे ओझे वाढले आहे. कर्जाचा डोंगर प्रचंड वाढला आहे. त्यामुळे देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्याची कबुली पाकिस्तानचे अर्थमंत्री असद उमर यांनी दिली आहे.


    सोशल मीडियावरील अर्थव्यवस्थेसंबंधी विचारलेल्या प्रश्नावर उमर म्हणाले, कर्जाचा मोठा बोजा घेऊन तुम्ही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे जात आहात. ही दरी खूप मोठी आहे. ती भरुन काढावी लागणार आहे. पीएमएल-एन सरकारच्या कार्यकाळात महागाई निर्देशांक १० होता. परंतु तो आता तेवढा नाही. याबद्दल मी आभार व्यक्त करतो. अर्थव्यवस्थेची मंदीतून वाटचाल सुरू आहे. त्यामुळे राेजगाराचा दर कमी झाल्याचे उमर यांनी मान्य केले आहे. जागतिक आर्थिक व्यवहारसंबंधी नियामक संस्थेने (एफएटीएफ) दहशतवादी कारवायांवर बंदी आणण्याच्या विरोधात ठोस पावले उचलली नसल्यामुळे पाकिस्तानचा काळ्या यादीत समावेश होऊ शकतो. पॅरिस येथील एफएटीएफने गतवर्षी जूनमध्ये पाकिस्तानला इशारा दिला होता. मनी लाँडरिंग व दहशतवादी कारवायांसाठीची रसद रोखण्याचे आव्हान पाकिस्तान सरकारला पेलवता आलेली नाही. इस्लामिक स्टेट,अल-कायदा, जमात-उद-दवा, फलह-ए-इन्सानियत, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-माेहंमद, हक्कानी नेटवर्क, तालिबान या दहशतवादी संघटनांवर आर्थिक निर्बंध लावण्यात यशस्वी ठरला नाही.

    मालमत्ता लपवल्याचा आरोप; झरदारींना हायकोर्टाची नोटीस

    पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी १० लाख अमेरिकन डॉलर्स किमतीची मालमत्ता लपवून ठेवली असल्याने त्यांना संसद सदस्य पदापासून अपात्र ठरवावे, अशी मागणी करणारी याचिका इस्लामाबाद उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. न्यायालयाने या याचिकेवर झरदारी यांना नोटीस पाठवली आहे. सत्ताधारी तेहरीक-ए-इन्साफ या पक्षाचे नेते खुर्रम शेर झमान आणि उस्मान डार यांनी ही याचिका दाखल केली आहे. झरदारी यांच्या मालकीचा एक फ्लॅट न्यूयॉर्कमध्ये आहे. त्यांच्याकडे दोन बुलेटप्रूफ वाहनेही आहेत. फ्लॅट आणि वाहनांची किंमत १० लाख अमेरिकन डॉलर्स एवढी आहे, पण २०१८ च्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी ही मालमत्ता जाहीर केलेली नाही.

Trending