आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Finance Minister Says: 'Government And RBI Are Working Together To Save Every Account Holder's Money'

'सर्व खातेधारकाचे पैसे सुरक्षित, बँकेला वाचवण्यासाठी सरकार आणि आरबीआय एकत्र काम करत आहे'- निर्मला सीतारमण

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिझर्व्ह बँकेने 30 दिवसांपासून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या बँकांच्या बोर्डाचे नियंत्रण आपल्या हाती घेतले आहे

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, येस बँकेला वाचवण्यासाठी सरकार आणि आरबीआय एकत्र काम करत आहेत. त्यांनी बँकेच्या प्रत्येक खातेधारकाला विश्वास दिला आहे की, त्यांचे पैसे सुरक्षित आहेत आणि त्या आरबीआयच्या सतत संपर्कात आहेत. सरकार बँकेसाठी लवकरच रिझोल्युशन प्लॅन घेऊन येईल. मागील दोन महिन्यांपासून त्या वैयक्तिकपणे ही परिस्थिती पाहात आहेत. आता घेतलेला निर्णय सर्वांच्या हिताचा आहे. तसेच, त्या आरबीआयसोबत चर्चा करुन लवकर प्रकरणातून मार्ग काढली, असेही त्या म्हणाल्या. 

येस बँकेच्या समस्येचे निराकरण लवकरच केले जाईल : आरबीआय गव्हर्नर 

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास शुक्रवारी म्हणाले होते की, बँकेतील या मुद्द्यांचे निराकरण लवकरच केले जाईल. यासाठी 30 यासाठी दिवसांचा कालावधी निश्चित केला गेला आहे. रिझर्व्ह बँक यावर लवकरच कारवाई करेल. ते म्हणाले की, येस बँकेवर बंदी घालण्याचा निर्णय कोणत्याही एका घटकाच्या आधारे घेतलेला नाही. हा निर्णय देशातील बँकिंग आणि आर्थिक व्यवस्थेची सुरक्षा आणि स्थिरता अबाधित ठेवण्यासाठी घेतला गेला आहे. 


येस बँकेतून खातेधारक जास्तीत जास्त 50 हजार रुपये काढू शकत
ात

आरबीआयने येस बँकेतून पैसे काढण्याची कमल मर्यादा ठरवली आहे. आता बँकेचे खातेधारक जास्तीत जास्त 50 हजार रुपयेच काढू शकतात. येस बँकेच्या आर्थिक परिस्थितीमध्ये गंभीर घसरण आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने 30 दिवसांसाठी त्याच्या बोर्डचे नियंत्रण आपल्या हातात घेतले आहे. एसबीआयचे माजी डीएमडी आणि सीएफओ प्रशांत कुमार यांना बँकेचे प्रशासक बनवले गेले आहे. 

बातम्या आणखी आहेत...