Home | International | Pakistan | Financial Challenges For Imran Khan Right After Becoming Prime Minister Of Pakistan

इम्रान खान यांना वारसात मिळाली Pak ची रिकामी तिजोरी, देशाची आर्थिक परिस्थिती नेपाळपेक्षा वाईट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 18, 2018, 07:05 PM IST

पाकिस्तानच्या सरकारी तिजोरीत जितके परदेशी चलन आहे, त्यावर हा देश फक्त 60 दिवस आयात करू शकतो.

 • Financial Challenges For Imran Khan Right After Becoming Prime Minister Of Pakistan

  इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानी क्रिकेट संघाचे कर्णधार राहिलेले इम्रान खान आता पंतप्रधान बनले आहेत. त्यांनी शनिवारी पाकिस्तानच्या 22 व्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. निवडणुकीत इम्रान खान यांना ज्या आश्वासनावरून विजय मिळाला त्यांची पूर्तता करणे काही सोपे नाही. कारण, त्यांना यापूर्वीच्या सरकारने वारसा म्हणून रिकामी सरकारी तिजोरी दिली आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था सद्यस्थितीला नेपाळपेक्षा वाइट आहे. या देशाच्या तिजोरीत आता फक्त 9 अब्ज अमेरिकन डॉलर उरले आहेत. भारतासोबत त्याची तुलना होऊ शकत नाही. फायनान्शिअल टाइम्सच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या सरकारी तिजोरीत जितके परदेशी चलन आहे, त्यावर हा देश फक्त 60 दिवस आयात करू शकतो.


  परदेशी चलनात चीन नंबर एक
  सद्यस्थितीला चीनकडे सर्वाधिक 3125 अब्ज परदेशी चलन आहे. चीनच्या तुलनेत भारताकडे असलेल्या परदेशी चलनाची आकडेवारी खूप कमी आहे. भारताकडे सध्या 405 अब्ज अमेरिकन डॉलर इतके परदेशी चलन आहे. चीननंतर जपान दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. जपानकडे 1256 अब्ज डॉलर परदेशी चलन आहे. 800 अब्ज परकीय चलनासह स्वित्झरलंड तिसऱ्या आणि 488 अब्ज परदेशी चलनासह सौदी अरेबिया चौथ्या क्रमांकावर आहे. यानंतर रशिया 460 (अब्ज डॉलर) पाचव्या आणि तैवान (456 अरब डॉलर) सहाव्या क्रमांकावर आहे. भारताचा यादीत 7 वा क्रमांक लागतो.


  पाकिस्तानची आर्थिक अवस्था नेपाळ, बांग्लादेशपेक्षा वाइट
  शेजारील राष्ट्र पाकिस्तानकडे इतके कमी परदेशी चलन शिल्लक आहे, की त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी चीनची मदत घ्यावी लागत आहे. चीनच्या कर्जावरच सध्या पाकिस्तानचा कारभार सुरू आहे. आकडेवारीनुसार, पाकिस्तान 9 अब्ज अमेरिकन डॉलरसह यादीत 76 व्या क्रमांकावर आहे. तर नेपाळ आणि बांग्लादेश असे देश सुद्धा पाकिस्तानच्या पुढे आहेत.


  हे आहे पाकिस्तानच्या दिवाळखोरीचे कारण?
  पाकिस्तानी चलनाचे आंतरराष्ट्रीय बाजारातील मूल्य दिवसेंदिवस कमी होत आहे. एका अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया 120 वर आहे. पाकिस्तानात आयात वाढली आहे. चीन-पाक आर्थिक कॉरिडोरच्या बांधकाम प्रकल्पांमुळे सुद्धा पाकिस्तानची तिजोरी दिवसेंदिवस रिकामी होत आहे. CPEC 60 अब्ज अमेरिकन डॉलरचे प्रकल्प आहे. हे प्रकल्प सुरू झाले तेव्हापासून अमेरिकेने सुद्धा पाकिस्तानला दिली जाणारी आर्थिक मदत थांबवली आहे. त्यामुळे, गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तान आणखी कर्जबाजारी होत आहे.

Trending