आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅप्पलच्या उत्पादनांमध्ये त्रुटी शोधा, 10.7 कोटी रुपयांचे बक्षीस मिळवा; कंपनीचे खुले आव्हान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अॅपलने आपली उत्पादने आणि ऑपरेटिंग सिस्टम सर्वाधिक सुरक्षित सांगत दिले आव्हान
  • यापूर्वी कंपनीने ऑगस्टमध्ये केवळ बग प्रोग्रामविषयी अशी घोषणा केली होती

कॅलिफोर्निया - टेक्नॉलॉजी कंपनी अॅप्पलने आपली उत्पादने आणि ऑपरेटिंग सिस्टमला सर्वाधिक सुरक्षित सांगत सामान्या नागरिकांना आव्हान केले आहे.  कंपनीने सिक्युरिटी बाऊंटी प्रोग्राम जाहीर करत सांगितले की, जो कोणी अॅप्पलच्या उत्पदनांतील सुरेक्षा त्रुटी शोधून काढेल कंपनी त्याला 10.7 कोटी रुपयापर्यंत बक्षीस देण्यात येईल.  

अॅप्पलने म्हटले आहे की जर कंपनीला माहिती नसलेली आणि संबंधित विकसकास अनन्य अशी सुरक्षा त्रुटी आढळल्यास 50 टक्के बोनसही दिला जाईल. यापूर्वी कंपनीने ऑगस्टमध्ये केवळ बग प्रोग्रामविषयी अशी घोषणा केली होती. मात्र यावेळी सर्व सुरक्षा संशोधकांना खुले आव्हान करण्यात आले आहे.