आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार, 27 जानेवारी रोजी शतभिषा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती वरियान नावाचा शुभ योग तयार करत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना दिवस लाभाचा असून नोकरी-धंद्यात यशाचे नवे दरवाजे उघडले जातील. व्यापारात सुसंधी चालून येतील. या व्यतिरिक्त इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

  • मेष: शुभ रंग : मोरपंखी | अंक : १

नोकरीधंद्यात उत्साही वातावरण राहील. लहान मोठे आर्थिक लाभ मनाला दिलासा देतील. विरोधकांचा जोर आता कमी होईल. श्रमसाफल्याचे समाधान मिळवाल.

  • वृषभ: शुभ रंग : मोतिया | अंक : ७

दैनंदीन कामातही अडथळे येतील. आरोग्याच्या काही तक्रारी हैराण करतील. मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडतील. सत्संगाने मानसिक बळ मिळेल.

  • मिथुन : शुभ रंग : सोनेरी | अंक : ९

आज काही नकारात्मक विचार मनात येतील. काही क्षुल्लक मनाविरुध्द गोष्टींनीही राग अनावर होईल.महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्याच बऱ्या.

  • कर्क : शुभ रंग : क्रिम | अंक : ८

तुमचे मनोबल उत्तम राहील. तुमच्यातील सकारात्मकता समोरच्यास प्रभावित करेल. दुपारनंतर मात्र थोडीफार अस्वस्थता जाणवेल.  आर्थिक व्यवहार दुपारपूर्वी उरका.

  • सिंह : शुभ रंग : पिस्ता | अंक : २

शारिरीक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असल्याने आज तुम्हाला प्रत्येक कामांत प्रचंड उत्साह राहील. खर्च वाढता असला तरीही पैशाची कमतरता जाणवणार नाही.

  • कन्या : शुभ रंग : हिरवा | अंक : ५

उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ  आहे. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. नोकरदारांना साहेबांच्या लहरी सांभाळाव्या लागतील.  पत्नीच्याही लहरी सांभाळाल.

  • तूळ : शुभ रंग : चंदेरी | अंक : ३

कौटुंबिक स्तरावर काही मनासारख्या घटना तुमाचा कार्यउत्साह वाढवतील. आज मुले अज्ञाधारकपणे वागतील. एकतर्फी प्रेमाला समोरुन होकार मिळण्याची शक्यता आहे.

  • वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ४

कौटुंबिक वाद असतील तर आज दुपारनंतर ते सुसंवादाने मिटू शकतील. प्रवासात काही नवे हितसंबंध निर्माण होतील. आज घरचे सोडून लष्कराच्या भाकऱ्या भाजाल.

  • धनू : शुभ रंग : गुलाबी | अंक : ६

आज महत्वाची कामे दुपारपूर्वीच उरकून घेतलेली बरी.थोडी मानसिक अस्वस्थता राहील. काही महत्वाची मेल्स येणार आहेत. दुपरानंतर प्रवासास निघाल. 

  • मकर : शुभ रंग : मरून | अंक : ५

आर्थिक अडचणी असतील तर त्यावर दुपारनंतर मार्ग निघेल. इतरांस दिलेले शब्द पाळता येतील. प्रवास कंटाळवाणे होणार आहेत. मौल्यवान ऐवज सांभाळा. 

  • कुंभ : शुभ रंग : केशरी | अंक : ९

महत्वाचे व्यावसायिक करार दुपारनंतरच करावेत. काही हरवले असल्यास गवसेल. आपले म्हणणे इतरांना पटावेच असा अट्टहास करून चालणार नाही. 

  • मीन : शुभ रंग : पांढरा | अंक : ६

तब्येत ठणठणीत राहील. मनाजोगते आर्थिक लाभ होणार आहेत. प्रतिष्ठीतांच्या गाठीभेटी लाभदायक ठरतील. मित्रांच्या मदतीस धाऊन जाणार आहात.

बातम्या आणखी आहेत...