आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 9 मार्च रोजी पुरावा फाल्गुनी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे धृती नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. हा योग 12 पैकी 8 राशींसाठी चांगला राहील. धृती योग कुटुंब आणि कार्यक्षेत्रासाठी शुभ राहील. या योगाच्या प्रभावाने कौटुंबिक वातावरण चांगले राहील. एखाद्या गोष्टीचा वाद चालू असेल तर तो आज संपुष्टात येईल. इतर चार राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

  • मेष: शुभ रंग : भगवा | अंक : ९

शारिरीक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असल्याने आज तुम्हाला प्रत्येक कामांत प्रचंड उत्साह राहील. खर्च वाढता असला तरीही पैशाची कमतरता जाणवणार नाही.

  • वृषभ: शुभ रंग : पांढरा | अंक : २

कौटुंबिक वाद असतील तर आज दुपारनंतर ते सुसंवादाने मिटू शकतील. प्रवासात काही नवे हितसंबंध निर्माण होतील. गृहीणींनी झाकली मुठ झाकलीच ठेवणे हिताचे. 

  • मिथुन : शुभ रंग : केशरी| अंक : ५

आज महत्वाची कामे दुपारपूर्वीच उरकून घेतलेली बरी.थोडी मानसिक अस्वस्थता राहील. काही महत्वाची मेल्स येणार आहेत. दुपरानंतर प्रवासास निघाल.  

  • कर्क : शुभ रंग : आकाशी| अंक : १

तब्येत ठणठणीत राहील. मनाजोगते आर्थिक लाभ होणार आहेत. प्रतिष्ठीतांच्या गाठीभेटी लाभदायक ठरतील. प्रभावी  वक्तृत्वाने समोरच्यास प्रभावित कराल. 

  • सिंह : शुभ रंग : निळा | अंक : ४

महत्वाचे व्यावसायिक करार दुपारनंतर करावे. काही हरवले असल्यास गवसेल. आपले म्हणणे इतरांना पटवून देऊ शकाल. आज कुठेही तुमची मर्जी चालेल. 

  • कन्या : शुभ रंग : लाल | अंक : ८

महत्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार अाहे.आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. महत्वापूर्ण निर्णय जाणकार व्यक्तींच्या सल्ल्यानेच घ्या. 

  • तूळ : शुभ रंग : राखाडी | अंक : ३

काही दूरावलेल्या हितसंबंधांत सुधारणा होईल. पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. छान दिवस. 

  • वृश्चिक : शुभ रंग : गुलाबी | अंक : २

नोकरीधंद्यात उत्साही वातावरण राहील. विरोधकांचा जोर आता कमी होईल. श्रमसाफल्याचे समाधान मिळवाल. मित्रांच्या मदतीस धाऊन जाणार आहात. 

  • धनू : शुभ रंग : क्रिम | अंक : ८

दैनंदीन कामातही अडथळे येतील. आरोग्याच्या काही तक्रारी हैराण करतील. मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडतील. सत्संगाने मानसिक बळ मिळेल.

  • मकर : शुभ रंग : सोनेरी | अंक : ७

आज काही नकारात्मक विचार मनात येतील. काही क्षुल्लक मनाविरुध्द गोष्टींनीही राग अनावर होईल.महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्याच बऱ्या.

  • कुंभ: शुभ रंग : मरून | अंक : ६

कौटुंबिक स्तरावर काही मनासारख्या घटना तुमाचा कार्यउत्साह वाढवतील. आज मुले अज्ञाधारकपणे वागतील. एकतर्फी प्रेमाला समोरुन होकार मिळेल.

  • मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : १

उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ आहे. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. नोकरदारांना साहेबांचे मूड सांभाळावेच लागतील. पत्नीच्याही लहरी सांभाळाल.

बातम्या आणखी आहेत...