आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 6 ऑक्टोबरला पूर्वाषाढा नक्षत्रामुळे अतिगंड नावाचा योग तयार होत आहे. याचा अशुभ प्रभाव जवळपास१२ पैकी 6 राशीच्या लोकांवर राहील. याच्या प्रभावाने काही लोक वादामध्ये अडकू शकतात. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना धनहानी होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीतही दिवस चढ-उताराचा राहील. लव्ह-लाईफसाठी दिवस काही लोकांसाठी ठीक नाही. रविवारच्या या अशुभ योगामुळे सहा राशीचे लोक जास्त तणावात राहतील. इतर राशीच्या लोकांसाठी दिवस ठीक-ठाक राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

मेष: शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ४
नोकरदारांना त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल.कितीही राबलात तरी आज वरीष्ठांचे समाधान होणे कठीण.वडीलधाऱ्या माणसांची मने सांभाळावी लागतील.

वृषभ: शुभ रंग : क्रिम | अंक : ३
आज फक्त नाकासमोर चालावे असा दिवस. इतरांच्या भानगडीत न डोकावता आज फक्त आपल्या कामाशी कर्तव्य ठेवा. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या झटकून टाका. 

मिथुन : शुभ रंग : तांबूस | अंक : १
कार्यक्षेत्रात महत्वाचे करार मदार यशस्वी होतील. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने योग्य व्यक्ती संपर्कात येतील.विवाह विषयक बोलणी सकारात्ककपणे पार पडतील.


कर्क :  शुभ रंग : पांढरा | अंक
: ६
दुखणी आंगावर काढू नका. काही जुने आजार दार ठोठावण्याची शक्यता आहे. क्षुल्लक गोष्टीवरून आज मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता आहे.

सिंह : शुभ रंग : मरून| अंक : २
आज तुम्हाला आपला एखादा छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. काही रसिक मंडळी तर काम साेडून छंदास प्राधान्य देतील. तरूणांच्या मनात प्रेमांकूर फुलतील. 

कन्या : शुभ रंग : पिवळा| अंक : ४
प्रॉपर्टी खरेदी विक्रीच्या कामातील विघ्नं दूर  होतील. विद्यार्थी अभ्यास मनावर घेतील. कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागतील. गर्भवतींनी तब्येतीची काळजी घ्यावी.  

तूळ : शुभ रंग : पिस्ता| अंक : १
भावना व कर्तव्य याचा मेळ घालणे कठीण जाईल. महत्वाकांक्षांच्या आहारी जाताना आपल्या मर्यादाही ओळखणे  गरजेचे आहे. गृहीणींना  माहेरची ओढ लागेल.

वृश्चिक : शुभ रंग : जांभळा| अंक : ५
आर्थिक बाजू भक्कम राहील. योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन कामी येईल. पूर्वीच्या गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळेल. वादविवादात सरशी होईल.  


धनू :  शुभ रंग : राखाडी| अंक
: ७
आज तुमच्यावर जोडीदाराचा प्रभाव राहील. आपला मोठेपणा सिध्द करण्यासाठी सढळ हस्ते पैसा खर्च कराल. सायंकाळी एखाद्या चित्रपटाचा आस्वाद घ्याल. 

मकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : ८
आज तुमचा जास्त वेळ घराबाहेरच जाईल. बेरोजगारांना घरापासून लांब कामाच्या संधी येतील. उच्चशिक्षितांना विदेश गमनाच्या संधी खुणावतील. खर्च वाढणार आहे.

कुंभ : शुभ रंग : मोतिया | अंक : ६
व्यवसायात पूर्वीचे नियम बदलावे लागणार आहेत. मागणी तसा पुरवठा करणे गरजेचे आहे. काही मोठया लोकांच्या ओळखी आपल्या स्वर्थासाठी वापरून घ्या.     

मीन : शुभ रंग : सोनेरी | अंक : ९ 
व्यवसायात कामाचे तास वाढवावे लागतील. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपल्या काही तत्वांना मुरड घालावी लागेल. अहंकार  टाळून  हितसंबंध  जपणे  गरजेचे आहे. 

बातम्या आणखी आहेत...