आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

2 वर्षांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक

रविवार 12 जानेवारी रोजी पुष्य नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती विष्कुंभ नावाचा अशुभ योग तयार करत आहे. या अशुभ योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांनी सावध राहणे आवश्यक आहे. या लोकांच्या कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. मोठे आर्थिक व्यवहार करताना सावध राहावे. इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

  • मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : ३

आज सगळा दिवस अनुकूल आहे. दैनंदीन कामे सुरळीत पार पडतील. प्रापर्टी विषयी रेंगाळलेली कामे पुन्हा मार्गी लागतील. प्रेमप्रकरणे मात्र गोत्यात आणतील. 

  • वृषभ: शुभ रंग : पांढरा | अंक : ७

आज काहीशी आक्रमक वृत्ती राहील. तुमच्यात उच्च प्रतीचा आत्मविश्वास राहील. इतरांपेक्षा काही वेगळेच करून दाखवायची उमेद असेल. अती धावपळ टाळा.

  • मिथुन : शुभ रंग : गुलाबी | अंक : १

चांगली माणसे संपर्कात येतील. नव्या योजना उत्तम प्रकारे राबवता येतील. आज कामगारांना केलेल्या कष्टांचा योग्य मोबदला मिळेल. यशदायी दिवस.

  • कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : ८

आज तुमचे मनोबल कमीच असेल. मनाच्या द्विधा अवस्थेत महत्वाचे निर्णय टाळलेले बरे. स्पर्धकांना कमजोर समजून चालणार नाही. आळस सोडा. 

  • सिंह : शुभ रंग : लाल | अंक : ९

कामाच्या ठीकाणी हितशत्रूंचा उपद्रव वाढण्याची शक्यता आहे. आज बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्यायला हवे. रूग्णांनी डॉक्टरांच्या सूचना पाळाव्यात.

  • कन्या : शुभ रंग : निळा | अंक : ७

तुमचे कार्यक्षेत्रातील महत्व वाढेल. कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. विरोधकही तुमचे वर्चस्व मान्य करतील. काही अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे.

  • तूळ: शुभ रंग : जांभळा | अंक : ५

नोकरीत वरीष्ठ तुमच्यावर खूष  असतील. बढतीच्या  मार्गातील अडथळे आता दूर  होतील. उच्चपदस्थ मंडळींना  काही ठाम निर्णय घ्यावे लागणार आहेत. 

  • वृश्चिक : शुभ रंग : आकाशी | अंक : ६

आज मनांत काही नकारात्मक विचार येण्याची शक्यता आहे. घरातील थोरांचे विचार समजून  घ्यावे लागतील. तुम्हाला एकांत हवासा वाटेल.  

  • धनू : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : २

आज तुम्ही कुठेही आपलीच मर्जी चालवायचा प्रयत्न कराल. अहंकारामुळे काही हितसंबंध दुरावण्याची शक्यता आहे. वाणीत मृदुता असणे अत्यंत गरजेचे अाहे.

  • मकर : शुभ रंग : अबोली| अंक : १

आज वैवाहीक जिवनांतील काही जुन्या स्मृती मनास आनंद दंतील. व्यवसायांत भागिदारांशी सामंजस्य राहील. सकारात्मकतेने नव्या जबाबदाऱ्या पार पाडाल.

  • कुंभ : शुभ रंग : मोतिया | अंक : ३

आज घराबाहेर वादविवादात सामंजस्याने घेणे गरजेचे आहे. भविष्यकाळाच्या दृष्टीने एखादी गुंतवणूक करण्याचा विचार कराल. आज रागावर ताबा हवा.

  • मीन : शुभ रंग : क्रिम | अंक : ४

कुटुंबातील सदस्यांत सामंजस्य राहील. नवोदीत कलाकारांना प्रसिध्दी मिळेल. खेळाडू स्पर्धा गाजवतील. गृहीणी आज स्वत:साठी वेळ काढतील.  

बातम्या आणखी आहेत...