आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

2 वर्षांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
 • कॉपी लिंक

गुरुवार 26 डिसेंबर रोजी सूर्यग्रहण आहे. आजच्या दिवसाची सुरुवात मूळ नक्षत्रामध्ये होत असून वृद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी होईल. यासोबतच आजच्या ग्रहणाचा प्रभावही सर्व राशींवर राहील. आजच्या ग्रहस्थितीमुळे सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

 • मेष: शुभ रंग : अबोली | अंक : ९

आज प्रत्येक कामात विलंब ठरलेलाच. व्यावसायात वाढत्या स्पर्धेस तोंड देण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागतील. आपल्या अधिकारांचा दूरुपयोग टाळावा.  

 • वृषभ: शुभ रंग : पांढरा | अंक : ४

नवीन उपक्रम सुरु करायचे असतील तर आजचा दिवस योग्य नाही. आज कष्टांचाही अतिरेक टाळा.  जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, हे विसरु नका. 

 • मिथुन : शुभ रंग : क्रिम | अंक : ३

आज गरजेपुरतेच बोललात तर बरे होईल. रिकाम्या चर्चेतून वादच होतील. जोडीदार जे म्हणेल त्यास हो म्हणालात तर वैवाहीक जिवनात गोडीगुलाबी राहील. 

 • कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : १

आराेग्याच्या क्षुल्लक तक्रारीही दुर्लक्षित करुन चालणार नाहीत. रुग्णांनी पथ्यपाणी पाळावे अन्यथा आजार बळावेल. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या वेळीच झटका.

 • सिंह : शुभ रंग : मरून| अंक : ३

नोकरदारांना तेच तेच काम कंटाळवाणे होईल. नोकरीत बदल करावासा वाटेल. नवे कलाकार प्रसिध्दिच्या झोतात येतील. प्रेमी युगुलांना वेळेचे भान राहणार नाही. 

 • कन्या : शुभ रंग : जांभळा | अंक : २

आज स्थावर, शेतीवाडी संबंधीत व्यवहार फायद्याचे ठरतील. कलाकारांना रीकाम्या खुर्च्या बघाव्या लागणार आहेत. खेळाडूंनी सराव वाढवणे गरजेचे आहे.  

 • तूळ: शुभ रंग : माेतिया | अंक : ४

कौटुंबिक सदस्यांची नाराजी दूर करावी लागेल. आज जमिन खरेदी विक्रीचे व्यवहार टाळलेले बरे. मातोश्रींच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी. 

 • वृश्चिक : शुभ रंग : राखाडी | अंक : ५

अत्यंत उत्साही व आनंदी असा आजचा दिवस. कौटुंबिक सदस्यांत सामंजस्य राहील. विवाह विषयी बोलणी करायची असतील तर आजचा दिवस योग्य.

 • धनू : शुभ रंग : सोनेरी | अंक : ७

महत्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार अाहे. अनुभवी व्यक्तींचे सल्ले विचारात घेणे गरजेचे.  कामाच्या व्यापात आज तब्येतीकडे दुर्लक्ष होईल. 

 • मकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : ९

अनाठायी खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. दगदग होईल. बेरोजगार असाल तर घरापासून लांब जायची तयारी असूद्या. अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. 

 • कुंभ : शुभ रंग : चंदेरी | अंक : ६

आपला स्वार्थ  साधून घेण्यासाठी मोठया लोकांच्या ओळखी वापराल. मित्रही आज हिताचेच सल्ले देतील. ज्येष्ठांना संततीकडून शुभ समाचार येतील. 

 • मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ८

भावना व कर्तव्य यात मेळ घालणे कठीण जाईल.योग्यवेळी अधिकारांचा वापर करावाच लागणार आहे. आज मित्र खोटी अश्वासने देणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...