आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुरुवार 23 जानेवारी रोजी पूर्वाषाढा नक्षत्र असल्यामुळे हर्षण नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. काही लोकांचा अडकलेला पैसा परत मिळू शकतो. कर्जातून मुक्ती मिळेल. तणाव आणि वाद नष्ट होतील. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...
आज मनांत काही नकारात्मक विचार येण्याची शक्यता आहे. घरातील थोरांचे विचार समजून घ्यावे लागतील. तुम्हाला एकांत हवासा वाटेल.
आज तुमचे मनोबल कमीच असेल. मनाच्या द्विधा अवस्थेत महत्वाचे निर्णय टाळलेले बरे. स्पर्धकांना कमजोर समजून चालणार नाही. आज धाडस टाळा.
आज वैवाहीक जिवनांतील काही जुन्या स्मृती मनास आनंद दंतील. व्यवसायांत भागिदारांशी सामंजस्य राहील. सकारात्मकतेने नव्या जबाबदाऱ्या पार पाडाल.
कामाच्या ठीकाणी हितशत्रूंचा उपद्रव वाढण्याची शक्यता आहे. आज बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्यायला हवे. रूग्णांनी डॉक्टरांच्या सूचना पाळाव्यात.
कुटुंबातील सदस्यांत सामंजस्य राहील. नवोदीत कलाकारांना प्रसिध्दी मिळेल. खेळाडू स्पर्धा गाजवतील. गृहीणी आज स्वत:साठी वेळ काढतील.
नेहमीची कामे सुरळीत पार पडतील. प्रापर्टी विषयी रेंगाळलेली कामे पुन्हा मार्गी लागतील. पैशाची कमतरता भासणार नाही. प्रेमप्रकरणे मात्र गोत्यात आणतील.
आज काहीशी आक्रमक वृत्ती राहील. तुमच्यात उच्च प्रतीचा आत्मविश्वास राहील. इतरांपेक्षा काही वेगळेच करून दाखवायची उमेद असेल. अती धावपळ टाळा.
चांगली माणसे संपर्कात येतील. नव्या योजना उत्तम प्रकारे राबवता येतील. आज कामगारांना केलेल्या कष्टांचा योग्य मोबदला मिळेल. यशदायी दिवस.
आज तुम्ही कुठेही आपलीच मर्जी चालवायचा प्रयत्न कराल. अहंकारामुळे काही हितसंबंध दुरावण्याची शक्यता आहे. वाणीत मृदुता असणे अत्यंत गरजेचे अाहे.
आज घराबाहेर वादविवादात सामंजस्याने घेणे गरजेचे आहे. भविष्यकाळाच्या दृष्टीने एखादी गुंतवणूक करण्याचा विचार कराल. आज रागावर ताबा हवा.
तुमच्यासाठी सगळा दिवस अनुकूल आहे. तुमचे कार्यक्षेत्रातील महत्व वाढेल. कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. विरोधकही तुमचे वर्चस्व मान्य करतील.
नोकरीत वरीष्ठ तुमच्यावर खूष असतील. बढतीच्या मार्गातील अडथळे आता दूर होतील. उच्चपदस्थ मंडळींना काही ठाम निर्णय घ्यावे लागणार आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.