आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार, 5 मार्च रोजी फाल्गुन मासातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी असून आजच्या दिवशी आद्रा नक्षत्रामुळे आयुष्मान नावाचा खास योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होईल. लव्ह लाइफमध्ये काहीतरी नवीन घडेल आणि संबंध सुधारतील. काही राशींवर ग्रहांचा चांगला प्रभाव असल्यामुळे गुरुवारी धनलाभ होण्याची शक्यता राहील. इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

 

  • मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : ५

व्यवसायात जाहीरातबाजी वाढवावी लागेल. काही तत्व गुंडाळून ठेवावी लागतील. आज काही अती हुषार मंडळी संपर्कात येतील. डोके शांत ठेवण्याची गरज.

  • वृषभ: शुभ रंग : निळा | अंक : ७

आज रिकाम्या गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य देऊनच कार्यक्षेत्रातील वर्चस्व टिकवून ठेवता येईल. वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. शेजारी कुत्सित नजरेने बघतील.

  • मिथुन : शुभ रंग : केशरी | अंक : १

अती धावपळ टाळा. हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क करण्यास प्राधान्य द्या. व्यवसायात काही उत्तम संधी चालून येतील. आज जोडीदाराने दिलेले सल्लेही मोलाचे असतील. 

  • कर्क : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ८

व्यवसायातील वाढती स्पर्धा तुम्हाला बेचैन करेल.  कौटुंबिक वाढत्या गरजांमुळे जमाखर्चाचा तराजू डळमळीत होण्याची शक्यता आहे. कायद्यात रहा.

  • सिंह : शुभ रंग : पिस्ता | अंक : ७

स्थावरासंबंधीत अपूरे व्यवहार मार्गी लागतील. वास्तू व वाहन खरेदीसठी कर्जमंजूरी होईल. विद्यार्थ्यांकडून कौतुकास्पद कामगिरी होईल. अाज म्हणाल ती पूर्व.

  • कन्या : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ९

एखाद्या नव्या उपक्रमाची सुरवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवासायिक नवे करार यशस्वी होतील. यश हाकेच्या अंतरावर आल्याचे जाणवेल. 

  • तूळ : शुभ रंग : क्रिम | अंक : ६

नोकरीच्या ठीकाणी  आपल्या कामाव्यतिरीक्त फार खोलात शिरू नका. वरीष्ठांना काही सुचवण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. अडचणी  देवालाच सांगा. 

  • वृश्चिक : शुभ रंग : भगवा | अंक : ३

नवीनच झालेल्या ओळखीत लगेच विश्वास ठेऊ नका. काही गोडबोली माणसे भेटतील. झटपट लाभाचा मोह टाळणेच हिताचे. कामापुरतेच बोला.

  • धनू : शुभ रंग : गुलाबी | अंक : ५

समोरच्या व्यक्तीवर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा प्रभाव राहील. आज सभासंमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. जोडीदाराचे मन जपण्याचा प्रयत्न कराल.

  • मकर : शुभ रंग : सेनेरी | अंक : ४

आज फक्त कष्ट करीत रहा, फळाची अपेक्षा मात्र उद्याच करा. आज काही कंटाळवाणी कामे करावी लागणार आहेत. नोकरीत वरीष्ठांचे समाधान अशक्य. 

  • कुंभ : शुभ रंग : चंदेरी | अंक : १

आज कर्तव्या पेक्षा मौजमजेस प्राधान्य द्याल.चंगळवादी वृत्ती राहील. बऱ्याच दिवसांनी कही जुन्या मित्रांच्या सहवासात रमाल. आरोग्य उत्तम राहील.      

  • मीन : शुभ रंग : मोतिया| अंक : २

कुटुंबात आर्थिक सुबत्ता नांदेल. आज तुमचे मनोबल वाढवणाऱ्या कही घटना घडतील. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय कदाचित चुकण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...