आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार, 10 मार्च रोजी उत्तरा फाल्गुनी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे शूल नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या अशुभ योगाच्या प्रभावामुळे 6 राशींसाठी दिवस संकटाचा राहू शकतो. शूल योगात केलेले कोणतेही कार्य पूर्णत्वास जात नाही. यामुळे शास्त्रानुसार या दिवशी महत्त्वाची कार्ये टाळणेच चांगले. इतर 6 राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

  • मेष: शुभ रंग : मरून | अंक : ८

आज तुम्ही भावनेपेक्षा कर्तव्यास जास्त प्राधान्य द्याल.नोकरीत काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदर करील. ध्येय साध्य होतील.

  • वृषभ: शुभ रंग : गुलाबी | अंक : ७

आज तुमचा उंची राहणीमानाकडे कल राहील. यशस्वी व्यक्तींच्या सहवासात तुमच्या महत्वाकांक्षा वाढतील. आज संध्याकाळी प्रिय व्यक्तीच्या सहवासात रहाल.

  • मिथुन : शुभ रंग : पांढरा| अंक : ६

आज तुमच्या गृहसौख्यात वृध्दीच होणार आहे. वाहन वास्तुविषयी खरेदी विक्री फायद्यातच राहील. तरूण मंडळी बेफिकीरपणे वागतील. मुलांना शिस्त लावा.

  • कर्क : शुभ रंग : निळा| अंक : ५

आज तुम्हाला काही अप्रिय माणसांचा सहवास सहन करावा लागेल. कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करू नका. आज वेट अँड वॉच चे धोरण ठेवा.

  • सिंह : शुभ रंग : सोनेरी | अंक : ९

मनसोक्त खर्च केलात तरी आज पैशाची कमतरता भासणार नाही. येणी असतील तर मागा, म्हणजे वसूल होतील. नातलग व मित्रमंडळींत शब्दास मान राहील.

  • कन्या : शुभ रंग : राखाडी | अंक : ४

काही दूरचे नातलग संपर्कात येतील. मोठेपणा जपण्यासाठी खर्च कराल. आपल्या बोलण्याने कुणाची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्या.

  • तूळ : शुभ रंग : गुलाबी | अंक : १

आज तुम्ही आपले आवडते छंद जपण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. काहीजण सहकुटुंब प्रवासाचा आनंद घेतील. बेरोजगारांची वणवण चालू राहील.

  • वृश्चिक : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३

व्यावसायिकांची पैशाची आवक चांगली राहील. काही अर्धवट  उपक्रम नव्यानेे सुरु करता येतील. अपूऱ्या  स्वप्नांची  पूर्तता  होईल. गृहलक्ष्मी  प्रसन्न असेल.

  • धनू : शुभ रंग : पिस्ता| अंक : २

व्यवसायात उत्तम आर्थिक यश मिळून स्वत:चे वेगळेच स्थान निर्माण होईल. महत्वाकांक्षी व्यक्तीचा सहवास लाभेल. एखाद्या मित्रास मदत करावी लागेल.

  • मकर : शुभ रंग : भगवा | अंक : १

कार्यक्षेत्रात बिकट प्रसंग यशस्वीपणे हताळाल. तुमच्या प्रामाणिक मेहनतीस नशिबाची साथ मिळेल. अध्यात्मिक मार्गात असणाऱ्यांना उपासनेचे फळ मिळेल.

  • कुंभ: शुभ रंग : हिरवा| अंक : ८

काही आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल.खाण्यापिण्यावर नियंत्रण गरजेचे आहे. रूग्णांनी पथ्य पाणी सांभाळावे. बेकायदेशीर कृत्ये अंगाशी येतील.

  • मीन : शुभ रंग : चंदेरी | अंक : ३

आज धंद्यातील आवक जावक सेम सेमच राहील. जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. गृहीणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदीत होतील. 

बातम्या आणखी आहेत...