आजचे राशिभविष्य / जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

सिद्धी योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात

रिलिजन डेस्क

Feb 19,2020 12:05:00 AM IST

बुधवार 19 फेब्रुवारी रोजी पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजची ग्रहस्थिती सिद्धी नावाचा शुभ योग तयार करत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल. या राशीच्या लोकांना एक्स्ट्रॉ इन्कम होऊ शकते. सेव्हिंगही वाढेल. बिझनेस करणाऱ्या लोकांना गुंतवणुकीतून लाभ होईल. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

  • मेष : शुभ रंग : राखाडी | अंक : १

उद्योगधंद्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस असल्याने नव्या उपक्रमाची सुरवात टळा. आज तुम्हाला भक्तीमार्गात गोडी वाटेल. सज्जनांच्या सहवासात तुमचे मन रमेल.

  • वृषभ : शुभ रंग : हिरवा | अंक : ५

आज काही पूर्वीच्या चुका निस्तराव्या लागणार आहेत. वैवाहीक जिवनांत फार अपेक्षा नकोत. सगळयाच गोष्टी आपल्या मनासारख्या होतील अशी अपेक्षा नकाे.

  • मिथुन : शुभ रंग : क्रिम | अंक : ३

आपल्या अतीस्पष्ट बोलण्याने कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. आज मित्रांमधे न रमता आपल्या जोडीदारास वेळ देणे हिताचे राहील.

  • कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : ९

अती श्रमांचा तब्येतीवर परिणाम जाणवेल. आज विश्रांतीची गरज भासेल. कुणाकडून येणी असतील तर मागायला लाजू नका. पत्नीस नाही म्हणू नका.

  • सिंह : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ७

प्रकृती ठणठणीत असल्याने आज तुम्हाला कामात चांगला उत्साह राहील. वेेळेवर पुरेसा पैसाही उपलब्ध होईल. कुटुंंबियांच्या वाढत्या गरजा पुरवाव्या लागतील.

  • कन्या : शुभ रंग : पिस्ता| अंक : ८

कष्टांचाही अतिरेक करू नका. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण हे लक्षात ठेवा. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या वेळीच झटकून टाकलेल्या बऱ्या. आज व्यस्त दिवस.

  • तूळ : शुभ रंग : जांभळा | अंक : ५

काहीजणांना घरदुरुस्तीच्या काही किरकोळ कामात लक्ष घालावे लागणार आहे. कदाचित वाहनही रस्त्यात रूसुन बसण्याची शक्यता आहे. सतर्क रहा.

  • वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ६

धंदेवाईक मंडळींकडे पैशाचा ओघ चांगला राहील.नवे उपक्रम जोमाने सुरु करता येतील. महत्वाच्या वाटाघाटीत आपल्याच मुद्दयावर अडून राहता येईल.

  • धनू : शुभ रंग : केशरी | अंक : ३

आज एखादी गोष्ट फारच मनाला लाऊन घ्याल.तब्येत थोडी नरमच राहील. विरोधक तुमच्या चुका काढण्याचा प्रयत्न करतील. संयम ढळू देऊ नका.

  • मकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : ४

बेरोजगारांनी रोजगारासाठी दूरगावी जाण्याची तयारी ठेवावी. उच्च अधिकारी वर्गास बढती बरोबर बदलीही स्विकारावी लागेल. आज खर्च आवाक्या बाहेर राहील.

  • कुंभ : शुभ रंग : आकाशी | अंक : २

प्रतिष्ठींतांच्या ओळखी आपला स्वार्थ साधून घेण्यास वापरता येतील. उच्चशिक्षितांना मोठया पॅकेज च्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. आज स्वप्नपूर्तीचा दिवस.

  • मीन : शुभ रंग : मोतिया | अंक : १

कामाचा व्याप, अती महत्वाकांक्षा यामुळे आज काहीसे सैरभैर व्हाल. स्वत:साठी, कुटुंबासाठी वेळ काढणे अशक्य होईल. कुटुंबियांची नाराजी पत्करावी लागेल.

X