आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणत्या डिव्हाइसवर व्हायरसचा सर्वात जास्त धोका, जाणून घ्या 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस इंटरनेटशी कनेक्टेड आहेत त्याला व्हायरस अटॅकचा धोका आहे. घरातील सर्व डिव्हाइसेसमध्ये कोणाला सर्वात जास्त धोका आहे, ते जाणून घेऊ... 


1. कॉम्प्युटरवर सर्वात जास्त असते नजर 
त्यांना कॉम्प्युटर व्हायरस एका विशेष कारणाने म्हटले जाते, त्याचे कारण म्हणजे मॅलवेअरचे डिझाइनच कॉम्प्युटरमध्ये घुसखोरी करण्यासाठी केले होते, त्यामुळे कॉम्प्युटर त्यांच्या कक्षेत सर्वात जास्त येतात. कॉम्प्युटरमध्ये घुसून हे त्याला उपयोगाच्या लायक सोडत नाहीत. ते माहिती चोरतात किंवा पूर्णपण नष्ट करतात. व्यापार, शाळा आणि घरांत काम करणारे कॉम्प्युटरच सर्वात जास्त लक्ष्य ठरतात. त्यापासून वाचण्यासाठी सेक्युरिटी सॉफ्टवेअर अपडेट ठेवणे आवश्यक आहे. अनेक लोक एका पीसीचा वापर करत असतील तर सर्वांनी आपले पासवर्ड वेगळे ठेवावेत आणि एकच अॅडमिनिस्ट्रेटर असावा. 


2.स्मार्टफोन आणि टॅबलेटही त्यांच्या निशाण्यावर 
कॉम्प्युटरनंतर स्मार्टफोन आणि टॅबलेट्सही सहजपणे त्यावर कब्जा करू शकतात, कारण त्यात वेब ब्राउझिंगची क्षमता कॉम्प्युटरसारखीच असते. एक चुकीचे क्लिक केले किंवा एक फिशिंग ई-मेल उघडले की स्मार्टफोन किंवा टॅब व्हायरसने प्रभावित होतात. त्यावर अॅटॅक झाल्यानंतर संशयास्पद अॅप त्वरित हटवावेत आणि सेफ मोडमध्ये रीबूट केले जावेत. 


3. टीव्ही तुमचे बोलणे ऐकूही शकतो 
स्मार्ट टीव्ही वेगाने वाढत आहेत. त्यांची काही वैशिष्ट्ये आहेत, पण सुरक्षा समस्याही आहेत. जर एक चुकीचे अॅप डाऊनलोड केले असेल तर तुमचा टीव्ही तुमच्या ड्रॉइंग रूममध्ये होत असलेले प्रत्येक चर्चा तो ऐकू शकतो. जर तुमच्या टीव्हीत वेबकॅम आणि मायक्रोफोन असेल तर त्यांचा उपयोग होत नसताना ते कव्हर करून ठेवले जावेत. स्मार्ट टीव्हीत अँटी-मॅलवेअर डाऊनलोड केले जाऊ शकत नाही. चांगली बाब म्हणजे ज्यांच्यासाठी व्हायरस सोडले जातात ती माहितीच त्यावर नसते. 


4. स्मार्ट अप्लायन्सेसवरही हल्ले शक्य 
मायक्रोवेव्ह, फ्रीज, लाइट्ससारख्या स्मार्ट अप्लायन्सेसवर बहुधा अॅटॅक होत नाहीत, पण कॉन्ट्रॅक्ट मॅलवेअर त्यांचा वापर प्रभावित करतात. त्यात जे अॅटॅक पाहण्यास मिळाले ते वेगळ्या प्रकारचे आहेत. हॅकर्स या डिव्हाइसवर कब्जा केल्यानंतर एका खास वेबसाइटवर निश्चित केलेल्या वेळी अशाच काही हॅक्ड डिव्हाइसद्वारे एकसारख्या रिक्वेस्ट पाठवतात, त्यामुळे वेबसाइट क्रॅश होते. वाचण्यासाठी या डिव्हाइसेसचे युजरनेम आणि पासवर्ड बदलत राहावे. 


5. स्मार्ट स्पीकर आहे सर्वात सुरक्षित 
स्मार्ट स्पीकरला हॅक करणे कठीण आहे. हॅकरला गुगल सर्व्हर किंवा अॅमेझॉन हॅक करावे लागेल, तेव्हाच एखादा संवाद मिळू शकतो. 


टेक अलर्ट
रवी शर्मा, पुणे 

बातम्या आणखी आहेत...