आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पॅरिस- हॉलीवूडचा लोकप्रिय अॅनीमेशन चित्रपट "फायंडिंग निमो"मधून सर्वांच्या मनामनात घर करून बसलेली क्लाउनफिश नामशेष होण्याच्य मार्गावर आहे. जागतिक तापमानात होत असलेल्या बदलामुळे या माशाच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम पडत आहे.
फ्रांसच्या नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्च (सीएनआरएस), वुड्स होल ओशनोग्राफिक इंस्टीट्यूशन (डब्ल्यूएचओआय)च्या नवीन अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. ही रिपोर्ट इकोलॉजी लेटर्स नावाच्या पत्रिकेत प्रकाशित झाली. रिपोर्टनुसार, वातावरणातील बदलामुळे क्लाउनफिशच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम पडत आहे. याची माहिती तेव्हा मिळाली, जेव्हा मागील एका दशकापासून पापुआ न्यू गुआनामध्ये असलेल्या किम्बेच्या जैव विविधता असलेल्या हॉटस्पॉटमध्ये शास्त्रज्ञांनी शोध केला.
जेलीफिश हे क्लाउनफिशचे नैसर्गिक घर आहे
डब्ल्यूएचओआयचे शास्त्रज्ञ सायमन थोरोल्ड यांनी सांगितल्यानुसार, क्लाउनफिशचे नैसर्गिक घर समुद्रातील अॅनीमोन(जेलीफिश)आहे. जर उच्च गुणवत्ता असलेले अॅनीमोन निरोगी राहतील, तरच क्लाउनफिशची संख्या वाढू शकते. या दोन्ही प्रजाती मुंगा (कोरल)वर अवलंबुन असते, पण ग्लोबल वार्मिंगमुळे कोरल हळु-हळू नष्ट होत आहे. त्यामुळेच याचा परिणाम क्लाउनफिस आणि अॅनीमोनवर होत आहे.
क्लाउनफिशसाठी अनुकूल वातावरण तयार करतो अॅनीमोन
सीएनआरएसचे शोधकर्ते बेनोइट पॉजोल यांनी सांगितल्यानुसार, क्लाउनफिशमध्ये एक विशेष प्रजनन चक्र आहे, जे एक स्थिर, सौम्य वातावरणावर अवलंबुन असते. अॅनीमोनमुळे हे वातावरण क्लाउनफिशसाठी अनुकूल असतो. क्लाउनफिश आणि अॅनीमोन एक परस्पर पुरक संबंध बनवतात. पण, ग्लोबल वार्मिंगमुळे या वातावरणावर त्याचा वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे क्लाउनफिश आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.