Home | Sports | ICC Cricket World Cup 2015 | News | Fine to Mahendra Singh Dhoni for shouting on umpire

महेंद्रसिंग धोनीला ठोठावला दंड, थेट मैदानात जाऊन अम्पायरवर चिडणे 'कॅप्टन कूल'च्या अंगलट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 12, 2019, 02:02 PM IST

अम्पायर गंधे यांना जाब विचारण्यासाठी थेट मैदानत गेला होता धोनी

 • Fine to Mahendra Singh Dhoni for shouting on umpire

  स्पोर्ट डेस्क- चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंi धोनीला त्याच्या शांत स्वभवामुळे ''कॅप्टन कूल'' या नावाने ओळखतात. पण काल(ता.11) ला आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सविरूद्ध झालेल्या सामन्यात 'नो बॉल' देणाऱ्या अम्पायरवर त्याने प्रचंड राग व्यक्त करत थेट मैदानातच चिडचिड केली. या प्रकरणी धोनीला दंड ठोठावण्यात आलाय.


  चेन्नई आणि राजस्थानमध्ये झालेल्या सामन्यात अम्पायरच्या चुकीच्या निर्णयामुळे मॅचची चांगलीच चर्चा झाली. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अखेरच्या षटकात बेन स्टोक्सचा चौथा चेंडू मुख्य अम्पायर गंधे यांनी 'नो बॉल' दिला होता, पण लेग अम्पायर ब्रुस ऑक्सनफर्ड यांनी तो 'नो बॉल' नसल्याचे स्पष्ट केलं.

  'नो बॉल' घोषित झालेला चेंडू पुन्हा वैध दिल्याचे कळताच कर्णधार महेंद्रसिंग धोनी अम्पायरला जाब विचारण्यासाठी थेट मैदानत उतरला. मैदानात उतरताच त्याने अम्पायर गंधे यांच्यावर चिडचिड केली, पण दुसरे अम्पायर ऑक्सनफर्ड यांनी त्याची समजूत काढून त्याला माघारी पाठवले. थोड्यावेळाने प्रकरण शांत झाले, पण यावेळ संपूर्ण जगाला महेंद्रसिंग धोनीचे रौर्द रूप पाहायला मिळाले.

  आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे धोनीला त्या सामनाच्या मानधनामधील 50 टक्के दंढ ठोठावण्यात आला. धोनीने लेव्हल 2 नियमाचे उल्लंघन केल्याचे आयपीएलकडून कबुली देण्यात आली.


  सामन्यात राजस्थानने चेन्नईला विजयासाठी 150 धावांचे लक्ष दिले होते. पण मिचेल सॅन्टनरने शेवटच्या चेंडूवर जोरदार षटकार मारून चेन्नई सुपर किंग्सला विजय मिळवून दिला.

Trending