आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात तरुण पंतप्रधान बनल्या सना मरीन, अवघ्या 34 व्यी वर्षी घेणार पंतप्रधानपदाची शपथ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एंटी रिने यांनी मंगळवारी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला

हेलसिंकी- फिनलँडच्या वाहतुक मंत्री आणि सोशल डेमोक्रेटिक पार्टीच्या नेत्या सना मरीन (34) रविवारी पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. त्या उद्या(10 डिसेंबर) पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. जगाच्या इतिहासात सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा मान सना मरीन यांनी मिळवला आहे. मंगळवारी त्यांच्या पार्टीच्या एंटी रिने यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. देशात मागील एका महिन्यांपासून पोस्ट विभागातील कर्मचाऱ्यांचे आदोंलन सुरू होते, त्यातून तोडगा काढण्यात रिने यांना अपयश आल्याने त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. 

मरीन 27 व्या वर्षी महापौर बनल्या
 
मरीन यांनी टॅम्परे विश्वविद्यालयतून प्रशासकीय विज्ञानाची मास्टर डिग्री मिळवली. त्या अवघ्या 27 व्या वर्षीय टॅम्परेच्या नगर परिषदप्रमुके म्हणून निवडल्या गेल्या. त्या जून 2019 मध्ये वाहतूक आणि दूरसंचार मंत्री बनल्या.

तरुण पंतप्रधानांच्या यादीत यूक्रेनचे होन्चेरुक दुसऱ्या नंबरवर
 
जगात दुसरे सर्वा तरुण पंतप्रधान यूक्रेनचे ओलेक्सी होन्चेरुक आहेत. ते फक्त 35 वर्षांचे आहेत. मरीन यांना काही पत्रकारांनी त्यांच्या वयावरुन प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की, मी कधीच वय आणि जेंडरचा विचार केला नाही. मी काही करण्यासाठी राजकारणात आले आणि लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला.
 

बातम्या आणखी आहेत...