आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षभरापासून टीव्ही इंडस्ट्रीतून गायब आहे 'मे आई कम इन मॅडम'मधील हा अॅक्टर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः छोट्या पडद्यावरील गाजलेल्या‘मे आई कम इन मॅडम’या मालिकेत साजन अग्रवालच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेला अभिनेता संदीप आनंदची इमेज एक विनोदवीर अशी आहे. पण आता संदीप या इमेजमधून बाहेर पडू इच्छित आहे. संदीपने divyamarathi.comला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, ''मला कॉमेडियनच्या इमेजमधून बाहेर पडायचे आहे. अलीकडेच मी ‘कटिंग प्यार’ नावाच्या लव्ह स्टोरी असेलल्या शोमध्ये काम केले आहे. याशिवाय काही वेबसीरिज आणि इतर प्रोजेक्टवर काम सुरु आहे. वर्षभरापासून मी टीव्हीपासून दूर आहे. आता मी अशा एका भूमिकेत लोकांना दिसणार आहे, ज्यामध्ये प्रेक्षकांनी मला आजवर कधीच पाहिले नाही. प्रेक्षकांना मी सरप्राइज देणार आहे.’


कॉमेडियनची इमेज बदलण्यासाठी संदीपने आतापर्यंत ‘कॉमेडी दंगल’, ‘जबान संभाल के’, ‘पार्टनर’, ‘बेलन वाली बहू’, ‘विक्रम बेताल’ या मालिका सोडल्या आहेत. याविषयी संदीप सांगतो, ‘मी गेल्या 10-12 वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीत काम करतोय. पण टीव्ही इंडस्ट्रीत काम करण्याचा एक तोटा म्हणजे तुम्ही ज्या भूमिकेत हिट होता, तशाच भूमिका तुम्हाला ऑफर केल्या जातात. पुर्वी माझील आर्थिक परिस्थिती स्ट्राँग नव्हती, त्यामुळे मी एकसारख्या भूमिका करत राहिलो. पण आता मला माझी इमेज चेंज करायची आहे. मला टीव्ही जवळपास सगळ्याच कॉमेडी शोच्या ऑफर मिळाल्या, पण मी त्या स्वीकारल्या नाहीत.'


 30 मे 1987 रोजी मध्यप्रदेशातील जबलपूर येथे जन्मलेल्या संदीप आनंदने 2007 मध्ये यूटीवी बिंदासवर सुरु झालेल्या 'जस्ट यार चिल मार' या शोमधून डेब्यू केला होता. संदीपने कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. तो आतापर्यंत 'एफआईआर', 'बेताल और सिंहासन बत्तीसी' आणि 'भाभी जी घर पर हैं'सह अनेक विनोदी मालिकांमध्ये झळकला आहे. 

बातम्या आणखी आहेत...