आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • FIR Against Aligarh Muslim University Students For Protesting Against Citizenship Amendment Bill

नागरिकत्व विधेयकाला विरोध केल्यामुळे अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नागरिकत्व विधेयक लोकसभेत पास

नॅशनल डेस्क- सोमवारी लोकसभेत नाकरिकत्व विधेयक पास झाले. त्यानंतर आज विधेयक राज्यसभेत सादर केले जात आहे. या विधेयकानुसार पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांग्लादेशमधून येणाऱ्या हिंदू, शिख, जैन, पारशी, बौद्ध धर्मिय आश्रितांना भाराताचे नागरिकत्व दिले जाणार आहे. याविरोधात देशभरात संतापाची लाट उठली आहे. या दरम्यान, 'द हिंदू'ने दिलेल्या बातमीनुसार उत्तर प्रदेशमधील अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी विधेयकाविरोधात प्रदर्शन केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. यात जवळपास 500 विद्यार्थ्यांविरोधात तक्रार दाखल झाली आङे.पोलिसांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनसाठी रितसर परवानगी घेतली नव्हती. जेव्हा हे आंदोलन सुरू झाले, तेव्हा विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या परिसरातच थांबवण्यात आले. या दरम्यान काही विद्यार्थी नेत्यांनी पोलिस अधिकाऱ्यांसोबत वाद घातला. त्यामुळे विद्यार्थ्यांविरोधात कलम 188 आणि 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आम्ही विद्यापीठ परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनाक केला आहे, परिस्थिती नियंत्रणात आहे.

बातम्या आणखी आहेत...