आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • FIR Against Bollywood Actor Rahul Raj Singh In Mumbai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रत्युषा बनर्जीचा बॉयफ्रेंडविरोधात FIR दाखल, संगीतकार अंकित तिवारीचीही चौकशी होणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दिवंगत टीव्ही अॅक्ट्रेस प्रत्युषा बनर्जीचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता राहुल राज सिंह हा पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. त्याच्यावर एका कार्यक्रमाच्या नावाखाली अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. मुंबईतील सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये राहुल राज सिंहच्या विरोधात तक्रार दाखल करण्‍यात आली आहे. या प्रकरणी संगीतकार आणि म्युझिक कंपोझर अंकित तिवारी याचीही चौकशी करण्यात येणार आहे.

 
हे आहेत राहुल राज सिंहवर आरोप..
राहुल राज सिंह यान नववर्षाच्या स्वागतासाठी 'OCEANIC NEW YEAR BLAST' नामक एका शोचे आयोजन केले होते. शोसाठी प्रति व्यक्ती 3500 रुपये तिकीट ठेवण्यात आले होते. शोमध्ये गायक अंकित तिवारी हा परफॉरमन्स करणार होता. परंतु त्याला मानधन न मिळाल्याने त्याने शो रद्द केल्याचे अंकितने सांगितले. एवढेच नाही तरी हॉटेलमध्ये अनलिमिटेड ड्रिंक आणि जेवणाचीही व्यवस्था करण्‍यात आली होती. पैसे घेऊन योग्य निर्धारित केलेली  सर्व्हिस मिळाली नाही, असा आरोप केला जात आहे.
 
यामुळे नाराज झाले तक्रारदार..
अंकित तिवारी शोमध्ये येणार नसल्याची माहिती मिळताच हॉटेलमध्ये पोहोचलेले लोक संतापले. त्यांनी हॉटेलमध्ये तोडफोड केली. वातावरण जास्त चिघळल्याने राहुल राज सिंह याने हॉटेलमधून काढता पाय घेतला. राहुल राज सिंह याने पैसे न देताच फरार झाल्याचे हॉटेलच्या सूत्रांनी म्हटले आहे.