Interview / FIR फेम या अभिनेत्रीला रियल लाइफमध्ये आई व्हायचे नाही, यामागचे सांगितले कारण

पती-पत्नी दोघांनी एकमताने घेतला निर्णय
 

दिव्य मराठी वेब टीम

May 13,2019 02:14:21 PM IST


टीव्ही डेस्क - टेलीव्हिजनवर चंद्रमुखी चौटाला नावाने प्रसिद्ध असलेली कविता कौशिकने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले की, रियल लाइफमध्ये ती कधीच होणार नाही. कविताने यामागील कारण देखील सांगितले आहे.


कविताला आई होण्याची इच्छा का नाही?

38 वर्षीय कविताने मुलाखतीत सांगितले की, 'मला मुलासोबत अन्याय करायचा नाही. मी चाळीसव्या वर्षी आई झाले तर तो 20 वर्षांचा होईपर्यंत मी आणि माझे पती वृद्ध होऊ. त्यामुळे माझ्या मुलांनी वयाच्या 20 व्या वर्षी वृद्ध आई-वडिलांच्या सेवेत वेळ वाया घालवावा हे मला मान्य नाही. बहुतेक आमच्यात इतरांप्रमाणे पालक होण्याची इच्छा देखील नाहीये. मुलाला जन्म देऊन आम्ही त्याला मुंबई सारख्या वर्दळीच्या शहरात संघर्ष करण्यासाठी नाही सोडू शकत.'

परिवाराला घेतले दत्तक
कविताला आई व्हायचे नसले तरी तिने राजस्थानमधील आपल्या वडिलांच्या नातेवाईकांच्या एका कुटुंबाला दत्तक घेतले आहे. रोनितच्या मदतीने ती या परिवाराचे पालन करते. कविताने सांगितले की, 'आम्हाला दुसऱ्यांची मदत करायला आवडते यामुळे आम्ही हे पाऊल उचलले आहे.'

X
COMMENT