आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • FIR Filed Against A Person Who Brutally Beaten A Street Dog, Sonam Anushka Jacqueline Appealed For Help

रस्त्यावरच्या कुत्र्याला अमानुष मारहाण करणाऱ्यांविरुद्ध दाखल झाली FIR, सोनम-अनुष्का-जॅकलिनने केली मदतीची मागणी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : मुंबईच्या वरळी या भागामध्ये एक रस्त्यावरचा कुत्रा जेव्हा स्वतःला पावसापासून वाचवण्यासाठी एका बिल्डिंगमध्ये पोहोचला तेव्हा त्या बिल्डिंगच्या चौकीदाराने त्याला इतक्या वाईट पद्धतीने मारले की, तो कुत्रा कोमामध्ये गेला आहे. याची माहिती सोनम कपूरने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केली. मात्र याबाबबड जेव्हा काहीच कारवाई केली गेली नाही तेव्हा कुत्र्याला मारणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पशु क्रूरता अधिनियमच्या अंतर्गत एफआयआर दाखल केली गेली आहे.  

 

 

सोनमने शेअर केले फोटो व्हिडीओ... 
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ, फोटो आणि प्रतिक्रिया सोनम कपूरने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केल्या आहेत. कुत्र्याला मारणाऱ्या वॉचमन भाटियाच्या फोटोव्यतिरिक्त जखमी कुत्र्याची मेडिकल कंडीशनदेखील सांगितली आहे. सोनम व्यतिरिक्त अनुष्का शर्मा आणि जॅकलिन फर्नांडीजनेदेखील याबद्दल आपल्या इंस्टाग्रामवर फोटो-व्हिडीओ शेअर केले आहेत.