आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कास्टिंग डायरेक्टर विकी सिदानावर FIR दाखल, अभिनेत्री कृतिका शर्माने लावला होता लैंगिक शोषणाचा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. कास्टिंग डायरेक्टर विकी सिदानावर अभिनेत्री कृतिका शर्माने लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. अभिनेत्री कृतिका शर्माच्या तक्रारीनंतर विकी सिदानाविरुध्द मुंबईच्या वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये FIR दाखल करण्यात आला आहे. यापुर्वीही कृतिका अक्टोबरमध्ये मुंबईच्या वर्सोवा पोलिसस्टोशनमध्ये आपली तक्रार दाखल करण्यासाठी गेली होती. पण तेव्हा एफआयआर दाखल करण्यास तिला नकार देण्यात आला होता. यानंतर कृतिकाने महाराष्ट्र सरकारच्या गृह मंत्रालयात तक्रार दाखल केली. यानंतर आता पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. यामध्ये कलम 354, 509 आणि 406 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

 

झूम टीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत कृतिकाने 5 वर्षांपुर्वी घडलेल्या या घटनेविषयी सांगितले. कृतिकाने सांगितले की, ती 2013 मध्ये एका ऑडिशनच्या वेळी विकी सिदानाला भेटली होती. तिची निवड झाली म्हणून त्याने तिला बोलावले. हे खुप घाईमध्ये झाले. तिला तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी सांगितले आणि राहण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. तिने तिकीट बुक केले पण राहण्यासाठी विकी सिदानाच्या ऑफिसमध्ये मदत मागितली. कृतिकाने सांगितले की, तिने विकीला फोन केला, तो तिला म्हणाला की, माझ्या अनेक फिमेल फ्रेंड्स आहेत, तुझी राहण्याची व्यवस्था करतो.

 

तिने सांगितले की, मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर मी विकीच्या ऑफिसमध्ये गेले. तेव्हा त्याने प्रश्न केला की, 'जर मी तुझी मदत केली तर मला काय मिळेल?' कृतिकाने उत्तर दिले की, 'जर इंडस्ट्रीमध्ये माझे नाव झाले तर लोक म्हणतील की, तुम्ही मला कास्ट केले. यामुळे तुमचेही नाव होईल.' यावर विकीने उत्तर दिले की, 'तु याची काळजी करु नको, माझे पहिलेच खुप नाव आहे. यानंतर त्यांनी पुन्हा मला प्रश्न विचारला की, तु माझ्यासाठी काय करु शकते.?'

यानंतर कृतिकाने सांगितले की, ते मला घरी चल असे म्हणाले, विकी म्हणाला की, मी विवाहित असल्यामुळे काही अडचण येणार नाही.

 

कृतिकाने आरोप लावले आहे की, रस्त्यामध्ये त्याने माझ्यावर वाईट कमेंट केल्या. यानंतर काही अंतरावर मला उतरवले आणि म्हणाला की, माझी पत्नी तुला घ्यायला येईल. यानंतर कृतिकाने सांगितले की, घरी पोहोचल्यानंतर पत्नीची नजर चोरुन तो मला अश्लिल इशारे करत होता.

 

बातम्या आणखी आहेत...