आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ बच्चन आणि आमिर खान स्टारर 'ठग्स ऑफ हिन्दोस्तां'मधील सर्व पात्रांचे लूक आले समोर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान लवकरच "ठग्स ऑफ हिंदोस्तान" या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजे 8 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार असून चित्रपटातील सर्व पात्रांचे लूक रिव्हिल करण्यात आले आहेत. चित्रपटात लीड रोलमध्ये असलेल्या आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांच्यापासून ते कतरिना कैफ आणि फातिमा सना शेख या पात्रांचे लूक रिव्हील झाले आहेत. चित्रपटात कुणी ठग बनले आहेत, तर कुणी योद्धा. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला 'ठग्स ऑफ हिन्दोस्तां'च्या पाच महत्त्वाच्या पात्रांविषयी सांगतोय, ज्याची ओळख स्वतः आमिर खानने करुन दिली आहे. 

 

आमिर खान
चित्रपटात आमिर खान 'फिरंगी मल्लाह'च्या भूमिकेत झळकणार आहे. या लूकमध्ये आमिर विचित्र पोशाखात दिसतोय. खास गोष्ट म्हणजे तो एखाद्या घोड्यावर नव्हे तर गाढवावर स्वार झालेला दिसतोय. या भूमिकेसाठी आमिरने पियर्सिंग करण्यासोबतच केस वाढवले आहेत. आमिरने त्याच्या पात्राची मजेशीर अंदाजात ओळख करुन दिली आहे. त्याने लिहिले - ''और इ हैं हम, फिरंगी मल्लाह...हम से ज्यादा नेक इंसान इस धरती पे कहीं नहीं मिलेगा आपको। सच्चाई तो हमरा दूसरा नाम है और भरोसा हमरा काम। दादी कसम!!!''

 

येथे बघा ट्वीट... 

The biggest thug of all !!!
Love,
a.@SrBachchan as #Khudabaksh in #ThugsOfHindostan@yrf | @TOHTheFilm | #KatrinaKaif | @fattysanashaikh https://t.co/gfsCJWv5hK

— Aamir Khan (@aamir_khan) September 18, 2018

और इ हैँ हम, फिरंगी मल्लाह.
हम से ज्यादा नेक इन्सान इस धरती पे कहीं नहीं मिलेगा आपको.
सच्चाई तो हमरा दूसरा नाम है, और भरोसा हमरा काम.
दादी कसम !!!https://t.co/GyIsrM2rNp#ThugsOfHindostan | @yrf | @TOHtheFilm | @SrBachchan | @fattysanashaikh | #KatrinaKaif

— Aamir Khan (@aamir_khan) September 24, 2018

 

 

बातम्या आणखी आहेत...