आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नास टाळाटाळ करणाऱ्या राेइंगपटू भाेकनळविरोधात गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आशियाई  स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा आॅलिम्पिक राेंइंगपटू दत्तू भाेकनळच्या विरोधात पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यासोबत वैदिक पद्धतीने लग्न करत जाहीर लग्न करण्यास नकार दिल्याप्रकरणी आडगाव पाेलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाेन वर्षांपूर्वी वैदिक पद्धतीने लग्न केल्यानंतर आता मात्र दाेन वेळा ठरवूनही लग्न करण्यास नकार दिल्याचा आरोप पीडित महिला कर्मचाऱ्याने करत आपला शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी तक्रार दिली आहे. आगामी आॅलिम्पिक स्पर्धेसाठी तयारी करणाऱ्या दत्तूविरोधात गुन्हा दाखल झाल्याने क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

 

पीडित महिला कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, दत्तू भाेकनळ व तिची २०१५ मध्ये चांदवड तालुक्यात रेडगाव येथे झालेल्या एका कार्यक्रमात आेळख झाली. आेळखीतून मैत्री हाेऊन पुढे प्रेमात रूपांतर झाले. २२ डिसेंबर २०१७ राेजी दत्तूने त्या महिलेला नाशिक फाट्यावर बाेलावून घेत  देवाची आळंदी येथे हिंदू वैदिक पद्धतीने सहमतीने विवाह केला. लग्नानंतर दत्तू भाेकनळचे नियमित आडगाव येथील पाेलिस मुख्यालयातील पीडित  महिलेच्या घरी येणे-जाणे हाेते. मात्र, लग्न थाटामाटात करायचे असल्याने दाेघांनीही घरी याबाबत सांगितले नव्हते. दरम्यान, ९ फेब्रुवारी २०१९ राेजी गावी लग्न करायचे ठरवून एकमेकांच्या घरी सांगितले. आई-वडील व मैत्रिणीसोबत लग्नासाठी खरेदीदेखील केली. लग्न समारंभासाठी  चांदवड तालुक्यातील निमगव्हाण येथे लाॅन्सचे बुकिंग करत आगाऊ रक्कम दिली होती. लग्न समारंभाची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असताना दत्तूने  लग्नाच्या दाेन दिवस आधी ७ फेब्रुवारी रोजी फोन करून लग्न करण्यास नकार दिला. लग्नाबाबत विचारल्यास विष पिऊन आत्महत्या करीन, अशीही धमकी दत्तूने दिली. 


नातेवाईकांना होते निमंत्रण 
त्यानंतर दत्तू व पीडित युवतीने पुन्हा २४ फेब्रुवारी राेजी संगमनेर येथील मालपाणी लाॅन्स येथे लग्न करण्याचे ठरवले. या लग्नासाठी  दोघांच्या नातेवाईक, मित्र परिवारालादेखील निमंत्रण देण्यात आले हाेते. 

बातम्या आणखी आहेत...