Home | Maharashtra | Mumbai | Fire at charchil chamber building in Kulaba, one died 3 injured

कुलाब्यातील इमारतीला भीषण आग; एकाचा होरपळून मृत्यू, अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी

दिव्य मराठी वेब, | Update - Jul 21, 2019, 06:42 PM IST

अडीच तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश

  • मुंबई - मुंबईतील कुलाबाच्या ताज हॉटेलमागील चर्चील चेंबर या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली. या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला. रविवारी (21 जुलै) दुपारी 12.15 च्या सुमारास ही आग लागली. या आगीत अनेकजण अडकले होते. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार ते पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले.


    कुलाबातील चर्चील चेंबर ही फार जुनी इमारत आहे. या इमारतीला दुपारी 12.15 च्या सुमारास भीषण आग लागली. आग संपूर्ण मजल्यावर पसरली होती, धुराचे लोट उठू लागले. त्यामुळे या मजल्यावर राहाणारे लोक तिथेच अडकले. आग लागल्याचे कळताच, स्थानिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.

    आगीत अग्निशमन दलाचे दोन जवानही जखमी
    या इमारतीच्या बांधकामात लाकडाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात पसरली. अग्निशमन जवानांना तब्बल अडीच तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. पण या आगीत शाम (वय 54) या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर अन्य एक व्यक्ती जखमी झाला आहे. या आगीत अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप कळू शकले नाही.


  • Fire at charchil chamber building in Kulaba, one died 3 injured
  • Fire at charchil chamber building in Kulaba, one died 3 injured

Trending