आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदाबादमध्ये इमारतीच्या सहाव्या मजल्यावर भीषण आग, एकाचा मृत्यू तर तिघे जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- येथील जगतपूरजवळ गणेश जेनेसिस फ्लॅट्सच्या सहाव्या मजल्यावर भीषण आग लागून एका तरुणाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँप्रेसर फुटल्याने ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. या आगीचा परिणाम वरच्या मजल्यावरही झाला आहे. अग्निशमन दलाने तुर्तास या आगीवर निंयत्रण मिळवले आहे.

 

मुख्य अग्निशमन अधिकारी एमएफ दस्तूर यांनी सांगितल्यानुसार- अग्निशमन विभागाने आतापर्यंत 15 जणांना सुरक्षित बाहेर काढले आहे. घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या 10 गाड्या आग विझवण्याचे काम करत आहे. आगीत जखमी झालेल्यांना रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे.


पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळवता आले- अधिकारी
नव्या मजल्यावर दोन जण अडकले आहेत. त्यांचे वजन जास्त असल्यामुळे त्यांना खाली आणण्यात अडचण येत आहे. पण सात जणांना वाचवण्यात आले आहे. बचावकार्यादरम्यान फ्लॅटमधील रहिवाशांनी अग्निशमन दलच्या कर्मचाऱ्यांसोबत धक्काबुक्की केली. पोलिसही गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी अयशस्वी ठरली. त्यामुळे बचावकार्यात अडथळा येत आहे.

 

सुरतमध्ये कोचिंग सेंटरला लागली होती आग
सुरतच्या सरथाणा जकातनाका येथे तक्षशिला आर्केडमध्ये लागलेल्या आगीत मृतांची संख्या 23 वर पोहोचली आहे. या आगीत गंभीर जखमींपैकी दोघांचे शनिवारी उपचारादरम्यान निधन झाले. आग इतकी भयंकर होती बाहेर काढलेल्या मृतदेहांची ओळख पटवणे अशक्य बनले होते. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती.

बातम्या आणखी आहेत...