आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात निर्माणाधिन किंग्जवे हॉस्पिटल इमारतीला भीषण आग, 2 मजूर धुराने गुदमरून बेशुद्ध, 10 थोडक्यात बचावले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- उपराजधानी नागपुरात कस्तुरचंद पार्क जवळील किंग्जवे हॉस्पिटलच्या बांधकामधीन इमारतीला लागलेल्या भीषण आगीत अडकलेल्या 8 ते 10  मजुरांची कशीबशी सुटका करण्यात आली. यापैकी दोन मजूर धुराने गुदमरून बेशुद्ध पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी बाराच्या सुमारास या इमारतीच्या पाचव्या माळ्यावरून धुराचे लोट बाहेर येऊ लागल्याने आग लागल्याचे लगेचच लक्षात आले. अग्निशमन दलास या घटनेची माहिती देण्यात आली.

 

इमारतीत काही मजूर असल्याने लक्षात आल्यावर त्यांना शिडीच्या माध्यमातून प्रथम बाहेर काढण्याची व्यवस्था करण्यात आली. या काही महिला देखील होत्या. 8-10 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. त्यापैकी दोघे जण बेशुद्ध झाल्याने त्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. आग लागल्याने झालेल्या धावपळीत काही मजूर किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात आले. शाटसर्किट मुळे आग लागल्याचे सांगण्यात आले. अग्नीशमन दलाने 8 बंबाच्या मदतीने ही आग तीन तासात नियंत्रणात आणली.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... किंग्जवे हॉस्पिटलला लागलेल्या आगीची भीषणता दाखविणारे फोटो

बातम्या आणखी आहेत...