आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील लाकडी गोडाऊनला भीषण आग; लाखोंचे फर्निचर जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नांनतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
  • भीषण आगीत गोदामाचे लोखंडी शेड देखील वितळले

पुणे - उंड्री येथील एका लाकडी फर्निचरच्या गोडाऊनमध्ये रविवारी पहाटे 4 वाजता भीषण आग लागली. पुणे व पीएमआरङीए अग्निशमन दलाच्या 8 फायरगाड्यांसह 20 अग्निशमन जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 
 

20 जवानांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले
 
कोंढवा फायर स्टेशनचे स्टेशन अधिकारी प्रकाश गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उंड्री येथे ईश्वर कड यांच्या मालकीचे ‘हॅशवूड’ हे लाकडी फर्निचरचे 4000 चौरस फुटांचे मोठे गोडाऊन आहे. या गोडाऊनला आग लागल्याची माहिती पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलास पहाटे 4 वाजता मिळाली. घटनास्थळी दाखळ झालेल्या 20 जवानांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. यानंतर प्रकाश गोरे हे तीन फायरगाड्या आणि दोन बंबांसह घटनास्थळी पोहचले. भीषण आगीत गोदामाचे लोखंडी शेड देखील वितळले


गोदामात लाकूड, फोम, कागदपत्रे असे साहित्य असल्याने आग लगेच भडकली. आग लागलेले गोदाम सुमारे चार हजार चौरसफूट क्षेत्राचे असल्याने चारही बाजूने पाणी मारणे आवश्यक होते. गोरे यांनी पीएमआरडी अग्निशमन दलाशी संपर्क साधून तातडीने आणखी मदत मागवून घेतली आणि 20 जवानांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. या भीषण आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग एवढी भीषण होती की गोदामाचे लोखंडी शेड देखील त्यात वितळून गेले.