आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pune Fire: पुण्यातील येवलेवाडी परिसरात गोडाऊनला भीषण आग, अद्याप जीवितहानी नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - येथील येवलेवाडी दांडेकर नगर परिसरात एका गोडाऊनला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली. आगीचे वृत्त मिळताच अग्निशमन दलाचे 8 बंब, 3 टँकर आणि 2 जेसीबी घटनास्थळी दाखल झाल्या. बचाव पथकाच्या अथक प्रयत्नानंतर अखेर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. तोपर्यंत या गोडाऊनबाहेर लावलेल्या दोन मोठ्या वाहनांनी सुद्धा पेट घेतला होता. येवलेवाडीतील या आगीत अद्याप कुठल्याही प्रकारच्या जीवितहानीचे वृत्त नाही. आगीच्या कारणांचा अद्याप पत्ता लागला नसून कारणांचा शोध घेतला जात आहे.

 

या गोडाऊनला सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास आग लागली होती. हे गोडाऊन प्रामुख्याने खाद्य तेलाचा भांडार होता. आग इतकी भीषण होती की गोडाऊनसमोर लावलेल्या दोन वाहनांनी सुद्धा पेट घेतला. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने अवघ्या 9 मिनिटांत आग विझवली. तरीही पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यासाठी त्यांना बराच वेळ लागला. या घटनेत कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही. सोबतच, आर्थिक नुकसानीची सध्या आकडेवारी गोळा केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...