आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवा ऑटोमोटिव्ह शोरूमला आग; कोट्यवधींचे नुकसान, इंधनामुळे भडका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको- अंबड औद्योगिक वसाहतीतील सेवा ऑटोमोटिव्ह शोरूमला मंगळवारी (दि. ४) मध्यरात्री लागलेल्या आगीत कोट्यवधींचे नुकसान झाले. अनेक वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. शोरूम बंद असल्याने जीवितहानी टळली. अग्निशामक दलाने तत्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले.

 

शोरूममधील अनेक वाहनांमध्ये इंधन असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. काही क्षणांत अनेक वाहने आगीत सापडली. काही वाहनांचे केवळ सांगाडे शिल्लक राहिले. अग्निशामक दलाच्या तीन बंबांनी आगीवर नियंत्रण मिळविले. आगीचे कारण समजू शकले नाही. अधिक तपास सुरू आहे. आगीच्या तावडीत सापडलेल्या अनेक वाहनांचे केवळ सांगाडे राहिले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...